General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी त्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील लष्कराच्या कामगिरीचा आढावा घेत नव्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या. (General Upendra Dwivedi)


जनरल द्विवेदी म्हणाले की, गेल्या 2 वर्षांत भारतीय लष्कराने प्रत्येक आघाडीवर सज्जता, संतुलन आणि सतर्कता कायम ठेवली. ऑपरेशन सिंदूर हे या तयारीचे महत्त्वपूर्ण उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उत्तर सीमेवरील ऑपरेशन स्नो लेपर्ड अंतर्गत भारतीय लष्कराची तैनाती पूर्ण ताकदीने आणि उच्च सतर्कतेसह करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम सीमेवरही सैन्याने संयम आणि जबाबदारीने आपली भूमिका बजावल्याचे त्यांनी नमूद केले.



राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रत्येक प्रकरणात भारतीय लष्कराने स्पष्ट उद्दिष्ट, शिस्त आणि जबाबदारीच्या भावनेने कर्तव्य बजावले असून, या काळात भूदल, नौदल आणि वायुदल यांच्यातील समन्वय अधिक बळकट झाल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही दलांनी समान दृष्टिकोन, परस्पर विश्वास आणि उत्कृष्ट समन्वयाने कार्य केले, असेही ते म्हणाले.वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थिती सध्या स्थिर असली तरी संवेदनशील असल्याचे सांगत जनरल द्विवेदी यांनी भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानाला किंवा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला.


यावेळी त्यांनी आपले उत्तराधिकारी जनरल धीरज सेठ यांच्याकडे पदभार सोपवत त्यांना शुभेच्छा दिल्या. जनरल धीरज सेठ हे अनुभवी सैनिक आणि सक्षम नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर आपल्या गौरवशाली परंपरा कायम ठेवत नवी उंची गाठेल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे जनरल द्विवेदी म्हणाले.



जनरल धीरज सेठ यांनी मंगळवारीच भारतीय लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ते भारताचे 31 वे लष्करप्रमुख ठरले आहेत. सुमारे चार दशकांचा सैनिकी अनुभव असलेल्या जनरल सेठ यांनी डिसेंबर 1986 मध्ये भारतीय सैन्यात प्रवेश केला होता.

Comments
Add Comment

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक