Chembur School Bus Accident : चेंबूर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करा; आरक्षण उपवर्गीकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – एकनाथ शिंदे

आरक्षण उपवर्गीकरणावर चर्चेतून तोडगा काढणार; संघर्ष समितीला शिंदेंचे आश्वासन


मुंबई : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थी जखमी झाल्याच्या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने आणि योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (Chembur School Bus Accident)



शिंदे यांनी सांगितले की, त्यांनी खासदार राहुल शेवाळे आणि आमदार काते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांना मुलांवर तातडीने उपचार करण्यासह त्यांच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


पावसाळ्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी झाडांच्या फांद्यांची वेळेत छाटणी झाली होती का, याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे शिंदे म्हणाले.


दरम्यान, आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात आनंदराज आंबेडकर, बबनराव घोलप, राजकुमार बडोले यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भातील मागण्या आणि सूचना शिंदे यांच्यासमोर मांडल्या.



यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, या विषयाचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेतला जाईल. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, सर्व समाजांना न्याय मिळेल ही महायुती सरकारची भूमिका आहे.


यासंदर्भात सुमारे २५ आमदारांनीही त्यांची भेट घेतल्याचे सांगत शिंदे यांनी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले. चर्चेच्या माध्यमातूनच योग्य मार्ग काढला जाईल आणि न्याय्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.