Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक



मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग आणि राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन्ही प्रकल्पांबाबत नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांची भेट घेणार आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर पाठपुरावा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.





विधानभवनात आयोजित बैठकीत नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीला विविध जिल्ह्यांतील आमदार उपस्थित होते, तर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. (Nashik Pune High Speed Rail)



राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, या रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबतही चर्चा केली जाणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन त्यांची भेट घेणार आहे. हा प्रकल्प नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा असून पुणे आणि नाशिकदरम्यान वेगवान संपर्क निर्माण करेल, असे त्यांनी सांगितले.



राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाबाबतही बैठकीत चर्चा झाली. या प्रकल्पासंदर्भातील शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून या विषयावरही सकारात्मक निर्णयासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जीएमआरटीशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधण्याची गरज व्यक्त केली. परदेशातील अशाच प्रकल्पांचे उदाहरण देत मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली केंद्राकडे प्रभावी पाठपुरावा करण्याची सूचना त्यांनी केली.




Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी