Asiatic Library: एशियाटिक लायब्ररीच्या संवर्धनासाठी ५.६३ कोटींची कामे; जुलैअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

एशियाटिक लायब्ररीच्या जतनासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ५६३.३३ लाखांचा निधी मंजूर


मुंबई : राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या एशियाटिक लायब्ररी इमारतीच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने व्यापक दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला आणि कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.





या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ५६३.३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून एकूण १२ संवर्धन आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे जुलै २०२६ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.





यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, एशियाटिक लायब्ररी ही केवळ ग्रंथालयाची इमारत नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक इतिहासाचा महत्त्वाचा वारसा आहे. या ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप कायम ठेवत आवश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.



या प्रकल्पांतर्गत ग्रंथालय संचालनालय, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आणि एशियाटिक सोसायटीच्या कार्यालयांमध्ये रंगकाम, गिलावा दुरुस्ती, छताची दुरुस्ती, लाकडी दरवाजे, खिडक्या आणि कपाटांचे संवर्धन, तसेच विविध नागरी दुरुस्तीची कामे केली जात आहेत. याशिवाय शौचालयांचे नूतनीकरण, कर्मचारी कक्षांची दुरुस्ती, जिने, वाचन कक्ष आणि संशोधन संस्थेच्या कक्षांमध्येही आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.



तळघरातील ग्रंथसंग्रह सुरक्षित ठेवण्यासाठी ओलावा नियंत्रण आणि संरचनात्मक मजबुतीकरणाची कामेही करण्यात येत आहेत. वारसा वास्तू संवर्धनाचे सर्व निकष पाळून कामे करण्यात यावीत आणि नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल, याची काळजी घेण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी दिल्या.

 
Comments
Add Comment

Har Ghar Tiranga : प्रत्येक विभागात निघणाऱ्या तिरंगा रॅलीत मुंबईकरांनी सहभागी व्हावे

- मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक

Mumbai Water Cut : मुंबईकरांवरील कपात कायम, पण जलतरण तलावांचा पाणी पुरवठा पूर्वव्रत

- तलावांमधील पाणी अद्यापही ९० टक्क्यांच्या पुढे जाईना मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा

Mumbai Landslide-prone Locations : मुंबईत ४६ दरडीची ठिकाणे ही अतिधोकादायक

- मुंबई महापालिकेला येथील रहिवाशांना बाहेर काढायचा अधिकार काय? - जिल्हाधिकारी तोंडावर बोट ठेवून गप्प बसले,

Zeeshan Siddique : ‘तुला जिवंत सोडणार नाही’; NCP नेते झीशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी, फरार गँगस्टरकडून ऑडिओ मेसेज

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक