Nashik Food Poisoning : नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. मटणाचं जेवण एका शेतकरी दाम्पत्याच्या जीवावर बेतल्याची मन हेलावणारी घटना बागलान तालुक्यातील आखतवाडे गावातून समोर आली आहे.
परराज्यांतील मच्छिमारांनी घुसखोरी केल्यास कठोर कारवाई; मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत निवेदन मुंबई : राज्यातील मत्स्य साठ्याचे जतन करण्यासाठी ...
नेमकं काय घडलं ?
ह्याळीज या शेतकरी वृद्ध दाम्पत्याने रविवारी रात्री मटणाच्या जेवणाचा बेत आखला होता. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी घरी मटण शिजलं. ह्याळीज शेतकरी वृद्ध दाम्पत्याने जेवण केले अन त्यानंतर दही खाल्ले. मात्र दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Baglan Food Poisoning Case)
तर दुसरीकडे 78 वर्षीय शांताराम ह्याळीज यांच्यावर मालेगाव (Malegaon) येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण आखतवाडे गावावर आणि नाशिक परिसरात शोककळा पसरली आहे. (Baglan Food Poisoning Case)
Chief Breakup Officer : नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महिन्याला २.८ लाखांचा पगार आहे त्यामुळे लाईफ सेट अशी नोकरी. विशेष म्हणजे या नोकरीत ऑफिसचं ...
नेमकी विषबाधा कशामुळे ?
दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकी ही विषबाधा मटणामुळे झाली की दह्यामुळे, याबाबत परिसरात तर्कवितर्क लावले जात आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अनेकदा मटण आणि दही एकत्र खाल्ल्याने किंवा अन्न शिळे असल्यास फूड पॉयझनिंग (Food Poisoning) होण्याचा धोका असतो. मात्र, या प्रकरणातील नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. (Baglan Food Poisoning Case)
'Strawberry Moon' : आजची संध्याकाळ आकाश निरीक्षकांसाठी आणि खगोलप्रेमींसाठी खास ठरणार आहे. आज आकाशात 'स्ट्रॉबेरी मून' पाहायला मिळणार असून, वर्षातील सर्वात सुंदर ...
अन्नाचे नमुने पुणे प्रयोगशाळेत
घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक प्रशासनानं आणि पोलिसांनी तात्काळ पावलं उचलली आहेत. या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी आणि मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्या रात्रीच्या अन्नाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. हे सर्व नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.





