Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पावशीजवळ कार-पिकअपची समोरासमोर धडक

भीषण अपघातात चालक गंभीर जखमी 



सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर पावशी (Pawashi) येथील बेल नदीजवळ भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात कारचालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Mumbai Goa Highway Accident)



मिळालेल्या माहितीनुसार, एक कार कणकवलीहून गोव्याच्या दिशेने जात होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप वाहनाशी पावशी येथील बेल नदीजवळ कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.


अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि इतर वाहनचालकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी चालकाला त्वरित उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.



अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि