Nasrapur Death Case : "त्या नराधमाला प्रत्यक्ष..."; ऐतिहासिक निकालानंतर नसरापूर पीडितेच्या आई-वडिलांची भावनिक प्रतिक्रिया

- पीडितेच्या पालकांना अश्रू अनावर


पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना त्यांनी, "हा निकाल योग्य आहे, पण त्या नराधमाला प्रत्यक्ष फाशी दिली जाईल, तेव्हाच आमच्या मुलीला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असे आम्ही समजू," असे सांगितले. (Nasrapur Death Case)


निकालावेळी कोर्टात भावनांचा बांध फुटला :


गेल्या दोन महिन्यांपासून न्यायाची प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबासाठी हा दिवस अत्यंत भावनिक ठरला. न्यायालयात निकालाचे वाचन सुरू असताना पीडितेच्या आईला अश्रू अनावर झाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावल्याने दिलासा मिळाला असला, तरी अंतिम समाधान आरोपीला प्रत्यक्ष फाशीची शिक्षा झाल्यानंतरच मिळेल. त्यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की, आरोपीने उच्च न्यायालयात किंवा इतर न्यायालयात अपील केले तरी त्याची शिक्षाच कायम राहील. "आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे," असेही त्यांनी नमूद केले. (Nasrapur Death Case)



'कायद्याचा धाक समाजात कायम राहील' :


पीडितेच्या वडिलांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. "या निकालामुळे समाजात स्पष्ट संदेश जाईल की, अशा अमानुष गुन्ह्यांना कायदा कधीही माफ करत नाही. कठोर शिक्षा मिळतेच," असे ते म्हणाले. तपासापासून न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. (Nasrapur Death Case)



समाजाला भावनिक आवाहन :


या दुःखद प्रसंगातून जात असतानाही पीडितेच्या आईने समाजाला महत्त्वाचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, अशा घटनांमध्ये पीडित कुटुंब अनेक संकटांना सामोरे जात असते. त्यामुळे समाजाने अशा कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. "समाजाने साथ दिली तरच पीडित कुटुंबाला न्यायासाठी लढण्याचे बळ मिळते. आजच्या निर्णयामुळे गुन्हेगाराला कठोर शिक्षा होऊ शकते, हा विश्वास समाजात निर्माण होईल," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. (Nasrapur Death Case)


https://prahaar.in/category/maharashtra/#google_vignette

आरोपीला 'या' कलमांखाली शिक्षा :


या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत बलात्कार, खून, विनयभंग तसेच इतर गंभीर गुन्ह्यांशी संबंधित विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले होते. याशिवाय, POCSO कायद्याच्या कलम ४,६,८ आणि १२ अंतर्गतही त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षी आणि तपासातील निष्कर्ष ग्राह्य धरत विशेष न्यायालयाने सर्व आरोप सिद्ध मानले आणि आरोपीला फाशीची शिक्षा सुनावत या प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला. (Nasrapur Death Case)

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि