Nasrapur Case: निगरगट्टच तो ! फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही भीमराव कांबळे… ; शिक्षा सुनावल्यावर कोर्टात आरोपीचे हावभाव कसे होते ?

Nasrapur Case :  संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणीत होती. नसरापूर (Nasrapur) येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर 63 वर्षीय आरोपी भीमराव कांबळेने (Bhimrao Kamble) अत्याचार करत तिची हत्या केली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अखेर हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात (Fast-track court) चालवण्यात आले आणि आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.



भीमराव कांबळे दोषी


तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार व हत्येच्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने (Pune Sessions Court) महत्त्वाचा निकाल दिला आहे. दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्याची प्रतिकिया धक्कादायकच होती. २६ जून रोजी न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले होते. त्यावेळी निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशी (Death Sentence) अशी कठोर शिक्षा सुनावली आहे. पण जेव्हा कोर्टाच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा भीमराव कांबळे यांची प्रतिक्रिया कशी होती? आरोपीला केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.



भीमराव कांबळेची प्रतिक्रिया कशी होती ?


निकाल वाचून झाल्यानंतर न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपी भीमराव कांबळेला उद्देशून म्हटले, “आता फासावर चढा.” निकालाच्या वेळी आरोपी कांबळे पूर्णपणे शांत होता. त्याने कोणताही भावनिक प्रतिसाद दिला नाही आणि खाली मान घालून उभा राहिला.



पीडितेच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया


निकाल ऐकताच पीडित बालिकेच्या आई-वडिलांचे अश्रू अनावर झाले. मुलीला न्याय मिळावा म्हणून कुटुंबीय पहिल्या दिवसापासून सातत्याने प्रयत्न करत होते. राज्यभरात झालेल्या आंदोलनांमध्येही ते सक्रिय सहभागी होते. आज अखेर न्याय मिळाल्याने त्यांच्या भावना उचंबळून आल्या. ते बराच वेळ कोर्टात रडत होते.



फाशीची शिक्षाही या गुन्ह्यासाठी अपुरी


न्यायालयात या प्रकरणाला ‘रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट’ (सगळ्यात दुर्मिळातील दुर्मिळ) प्रकरण म्हणण्यात आले. निकालात न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी म्हटले की, आरोपीच्या कृत्यांमध्ये अत्यंत निर्दयीपणा दिसून येतो. तीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर केलेला हा अत्याचार अक्षम्य आहे. आरोपीला गुन्ह्याचा पश्चाताप झालेला दिसत नाही. त्याच्यावर दया दाखवण्यासारखे कोणतेही कारण नाही. सबळ पुरावे आरोपीविरुद्ध असल्याने त्याला मृत्यूदंड देणे अपरिहार्य आहे. न्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितले की, “फाशीची शिक्षाही या गुन्ह्यासाठी अपुरी आहे, पण यापेक्षा मोठी शिक्षा कायद्यात उपलब्ध नाही.”

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि