- विधान परिषदेत मंत्री शंभूराजे देसाई यांची माहिती
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात आज कोकणातील खारे पाणी आणि मोडकळीस आलेल्या बंधाऱ्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान या गंभीर समस्येवर जोरदार चर्चा झाली. भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रमोद जठार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, कोकणातील बंधाऱ्यांची डागडुजी आणि निकषांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी लवकरच संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिली आहे. (Minister Shambhuraj Desai)
समुद्राचे पाणी शेतात शिरल्याने शेती धोक्यात: आमदार प्रवीण दरेकर
आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील गंभीर परिस्थितीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये समुद्राचे खारे पाणी थेट शेतात शिरत असल्याने हजारो हेक्टर शेती धोक्यात आली आहे. याचा मोठा फटका भातशेती, नारळ बागा आणि मच्छीमार बांधवांना बसत आहे. मातीमधील क्षार वाढल्याने जमीन नापीक होत असून, अनेक वर्षांपूर्वी बांधलेले खारे पाण्याचे बंधारे आता पडझडीच्या स्थितीत आहेत. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तातडीने एक 'बृहद आराखडा' (Master Plan) तयार करावा, अशी मागणी दरेकर यांनी केली. तसेच, राज्याच्या निधीतून तरतूद करणे शक्य नसल्यास जागतिक बँक किंवा केंद्र शासनाच्या योजनांतून यासाठी आर्थिक तरतूद करावी, असेही त्यांनी सुचवले. (Minister Shambhuraj Desai)
मुंबई : नीट, टीईटी यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असल्याने राज्याची देशभर बदनामी होत असून, लाखो विद्यार्थी आणि ...
९० टक्के ब्रिटिशकालीन बंधारे मोडकळीस: आमदार प्रमोद जठार
याच चर्चेत भाग घेताना आमदार प्रमोद जठार यांनी या समस्येला कोकणाला लागलेला 'कॅन्सर' असे संबोधले. कोकणच्या ७२० किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्यावर एकूण साडेतीन हजार ब्रिटिशकालीन बंधारे असून, त्यापैकी सुमारे ९० टक्के बंधारे आज मोडकळीस आले आहेत. यामुळे दरवर्षी सुमारे १,२०० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रतिवर्षी किमान ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी आणि रखडलेल्या दुरुस्ती कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी मागणी जठार यांनी केली. (Minister Shambhuraj Desai)
शासनाकडून निधीची तरतूद आणि सकारात्मक कामगिरी: मंत्री शंभूराज देसाई
आमदारांच्या या मागण्यांवर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले की, खारे जमीन आणि बंधाऱ्यांच्या कामांसाठी जलसंपदा विभागामार्फत सातत्याने नियोजन व प्रयत्न केले जात आहेत. राज्यात एकूण १६५ योजना मंजूर करण्यात आल्या असून, त्यापैकी १३६ कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण झाली आहेत. तसेच, एकूण ८१,५५८ हेक्टर क्षेत्रापैकी २०,१२७ हेक्टर जमीन पुनर्प्रस्थापित करून लागवडीयोग्य करण्यात शासनाला यश आले आहे. कांदळवन (मॅन्ग्रोव्हज) क्षेत्रामुळे काही तांत्रिक अडचणी येत असल्या तरी शासन यावर सकारात्मकतेने काम करत आहे. निधीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, जलसंपदा विभागामार्फत कोकणातील ५ जिल्ह्यांसाठी २०२४-२५ मध्ये २० कोटी आणि २०२५-६ मध्ये २७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Minister Shambhuraj Desai)
मुंबई : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या नसरापूर अत्याचार प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत मुख्य आरोपी भीमराव कांबळे (Accused Bhimrao Kamble) याला मरेपर्यंत ...
विशेष बैठकीचे आश्वासन :
मंत्री देसाई यांनी पुढे सांगितले की, सर्व बंधारे एकाच वेळी दुरुस्त करणे तांत्रिक व भौगोलिक कारणांमुळे शक्य नसले तरी, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आणि प्राधान्यक्रमानुसार कामांची निवड केली जात आहे. बंधाऱ्यांच्या वारंवार खराब होणाऱ्या उघडीच्या दरवाजांच्या (Sluice Gates) समस्येवर उपाय शोधण्यासाठी, तज्ज्ञांच्या सल्ल्याने नवीन डिझाईन किंवा तांत्रिक सुधारणा करण्याबाबत विभाग सकारात्मक आहे. सध्याचे निकष आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा सुवर्णमध्य साधण्यासाठी, तसेच सीआरझेड (CRZ) नियमावलीतील तांत्रिक अडथळे दूर करून जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये प्रस्ताव पाठवण्याबाबत लवकरच एक विशेष बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. (Minister Shambhuraj Desai)




