तपासानुसार, मिरवणुकीत काही लोकांना या कॅप्सूल्स "व्हिटॅमिन" किंवा "इम्युनिटी बूस्टर" असल्याचे सांगून दिल्या जात होत्या. काही नागरिकांना संशय आल्याने त्यांनी कॅप्सूलची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपीला ताब्यात घेतले. (Toxic Pills)
पोलिसांच्या प्राथमिक तपासात जप्त केलेल्या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाईड हे उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी रसायन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पदार्थाची अधिकृत फॉरेन्सिक तपासणी सुरू असून अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.
गुरुग्राममधील पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसही हैराण! हरियाणा : हरियाणातील गुरुग्राममध्ये पेट्रोल पंपावर (Petrol Pump) डिझेल भरून पैसे न देता ...
या प्रकरणात काही जणांनी कॅप्सूलचे सेवन केल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. संबंधितांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
तपासादरम्यान आरोपीने इंटरनेट, गुगल आणि एआयच्या माध्यमातून विषारी पदार्थांबाबत माहिती शोधल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, किंवा हा मोठ्या कटाचा भाग होता का, याचाही तपास सुरू आहे.
तिरुवनंतपुरम : केरळमधील त्रिशूर येथे अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी दोन महिलांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या ...
मुंबई पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून मिळणाऱ्या औषधांच्या गोळ्या किंवा कॅप्सूल स्वीकारू नयेत, असे आवाहन केले आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असून फॉरेन्सिक अहवाल आणि तपासातून पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे.






