Actor Satendra Soni : 'लापता लेडीज' फेम सत्येंद्र सोनीचा धक्कादायक आरोप! मानधन मागितल्यावर मारहाण, हॉटेलमधून...

मुंबई : 'लापता लेडीज' चित्रपटातील 'छोटू' या भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता सत्येंद्र सोनी (Actor Satendra Soni) सध्या एका धक्कादायक कारणामुळे चर्चेत आला आहे. सत्येंद्रने सोशल मीडियावर अश्रूंनी भरलेला एक व्हिडिओ शेअर करत एका चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप केले आहेत. काम पूर्ण करूनही मानधन न दिल्याचा, मारहाण केल्याचा, हॉटेलमधून बाहेर काढल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्याने केला आहे.व्हिडिओमध्ये सत्येंद्र अत्यंत भावूक अवस्थेत दिसत असून, त्याच्यासोबत असलेले आणखी दोन सहकारीही तणावाखाली असल्याचे दिसून येते. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, चाहत्यांकडून त्याला पाठिंबा मिळत आहे.




दिग्दर्शकावर गंभीर आरोप :


सत्येंद्र सोनीने दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंग यांच्यावर फसवणूक आणि गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, तो 'पेट पालकी' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. सुरुवातीला निर्मात्यांकडून ५० हजार रुपयांची साइनिंग अमाऊंट देण्यात आली होती. मात्र, उर्वरित मानधन शूटिंग पूर्ण झाल्यानंतर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. (Actor Satendra Soni)सत्येंद्रच्या म्हणण्यानुसार, शूटिंग संपल्यानंतर आठ दिवस उलटूनही पैसे मिळाले नाहीत. जेव्हा त्याने मानधनाची मागणी केली, तेव्हा त्याच्याशी वाद घालण्यात आला. त्यानंतर त्याला धमकावण्यात आले, भररस्त्यात मारहाण करण्यात आली आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे. (Actor Satendra Soni)




'सामान बाहेर फेकलं, हॉटेलमध्ये येण्यास बंदी' :


व्हिडिओमध्ये सत्येंद्र म्हणतो, "पैसे मागितल्यानंतर त्यांनी आमचे सामान हॉटेलच्या बाहेर फेकून दिले. पुन्हा हॉटेलमध्ये आल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. आम्हाला जीवे मारण्याचीही भीती दाखवली जात आहे." या घटनेमुळे तो आणि त्याचे सहकारी मानसिक तणावाखाली असल्याचेही त्याने सांगितले.








व्हिडिओ व्हायरल; पोलिसांची मदत :


सत्येंद्रचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी त्याची दखल घेतली. त्यानंतर मैहर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला मदत केली. काही तासांनंतर सत्येंद्रने आणखी एक व्हिडिओ शेअर करत आपण सुरक्षित असून मुंबईला परतल्याची माहिती दिली. पोलिसांचे आणि मदतीसाठी पुढे आलेल्या सर्वांचे त्याने आभारही मानले. (Actor Satendra Soni)



कोण आहे सत्येंद्र सोनी?


मध्य प्रदेशातील सिहोरा या छोट्या गावातील रहिवासी असलेल्या सत्येंद्र सोनीने अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही वर्षांपूर्वी मुंबई गाठली. संघर्षातून मार्ग काढत त्याने मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. 'द कपिल शर्मा शो' मधून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर *'लापता लेडीज'*मधील 'छोटू' या भूमिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. (Actor Satendra Soni).याशिवाय तो 'मिर्झापूर', 'अब तो भगवान भरोसे', 'वनवास' यांसारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही झळकला आहे. सध्या त्याच्या आरोपांमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून, दिग्दर्शक किंवा निर्मात्यांकडून अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. (Actor Satendra Soni)

Comments
Add Comment

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या