NZ VS ENG : न्यूझीलंड क्रिकेटला मोठा धक्का ! एकाच वेळी तीन दिग्गज खेळाडूंनी घेतली निवृत्ती

इंग्लंड खेळाडूंकडून मिळाला 'गार्ड ऑफ ऑनर'


लंडन : टी-२० महिला वर्ल्ड कप २०२६ मध्ये शनिवारी (२७ जून) ला गविजेता न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात उपांत्या फेरीच्या दृष्टीने महत्त्वाची लढत झाली. या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा ९ गडी राखून पराभव केला. या निकालामुळे न्यूझीलंड संघाला दुहेरी धक्का बसला, कारण सोफी डिव्हाईन, सुझी बेट्स आणि लिआ ताहुहू या तीन अनुभवी खेळाडूंनी टी२० आंतरराष्ट्रीय (T20 International) सामन्यांमधून निवृत्ती घेतली. सामन्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले.



सामना संपल्यांनतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी तिन्ही दिग्गजांना गार्ड ऑफ ऑनर देत सन्मानपूर्वक निरोप दिला. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच जाहिर केले होते की, सोफी डिव्हाईन (Sophie Devine), सुझी बेट्स (Suzie Bates) आणि लिया ताहुहू (Lia Tahuhu) यांच्यासाठी २०२६ महिला वर्ल्ड कप दहा अखेरचा वर्ल्ड कप असणार आहे. या तिन्हीही खेळाडुंनी अनेक वर्षे न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटला जगातिक स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. सूझी बेट्स न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू म्हणून निवृत्त होत आहे. बेट्सने तिच्या ३७० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विक्रमी १०,७२१ धावा केल्या, जो एक विशेष विक्रम आहे. सोफी डिव्हाइनने आपल्या २० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत न्यूझीलंडसाठी ३१७ सामने खेळले. या दरम्यान तिने वनडे सामन्यांमध्ये ४२७९ धावा आणि टी२० मध्ये ३८१७ धावा केल्या. त्याचबरोबर तिने २४१ विकेट्सही घेतल्या. त्यामुळे ती सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे.







व्हिडीओ व्हायरल

इंग्लंड खेळाडू आणि सहकारी या तिघांही गार्ड ऑफ ऑनर दिल्याने सुझी बेट्स आणि लिया ताहुहू यांच्या डोळ्यांत अश्रू आले. या तिघींचा निरोप समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोफी डिव्हाईनची स्फोटक फलंदाजी आणि अष्टपैलू कामगिरी, सुझी बेट्सची सातत्यपूर्ण फलंदाजी आणि लिया ताहुहूची वेगवान गोलंदाजी यामुळे न्यूझीलंड महिला संघाने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. या तिघींच्या निवृत्तीनंतर न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे.
Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या