मुलाचे करियर वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंची धावपळ सुरू
शिवसेना सचिव किरण पावसकर यांची खरमरीत टीका मुंबई : शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांत जाऊन मतदारांची माफी मागण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले आहेत, मात्र मतदारांची माफी मागण्याचा हा दौरा नसून मुलाचे करियर वाचवण्यासाठीचा दौरा असल्याची खरमरीत टीका शिवसेना सचिव व प्रवक्ते किरण पावसकर यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पावसकर म्हणाले की, आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे विदर्भात गेले आहेत, मात्र नगर पालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत उबाठा नेतृत्व बांद्रा बाहेर पडले नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना वाऱ्यावर सोडले होते. उबाठाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊनच खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या मतदार संघात जाऊन आज मतदारांनी माफी मागण्याचा उबाठाचा प्रयत्न आहेत. मात्र त्यांनी यापूर्वीच दौरा का केला नाही, असा प्रश्न तेथील कार्यकर्ते, पदाधिकारी, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख उबाठाला विचारतील. मतदारांची माफी नाही तर मुलाची राजकीय कारकिर्द वाचवण्यासाठी उबाठा दौरा करत आहेत, अशी टीका पावसकर यांनी केली.(The Government of India)
Badminton Asia Junior Championships : कझाकिस्तानवर मात करत भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक
'बॅडमिंटन आशिया ज्युनिअर चॅम्पियनशिप'मध्ये भारतीय संघाची चमकदार कामगिरी यात्सुशिरो (जपान): जपानमध्ये सुरू असलेल्या 'बॅडमिंटन आशिया ज्युनिअर ...






