Nashik : 'त्या' मुलीच्या मृत्यूप्रकरणी हलगर्जी आढळल्यास फौजदारी, आमदार हिरेंचे सक्त आदेश

Nashik : सिडको खुटवडनगर येथील एचपीव्ही लसीकरण शिबिरानंतर १७ वर्षीय श्रावणी अनिल पाटील या निष्पाप मुलीचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारा आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार सीमा हिरे (MLA Seema Hire) यांनी शुक्रवारी श्रावणीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. पाटील कुटुंबीयांना धीर देत आमदार हिरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याचे आक्रमक आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. वैद्यकीय आणि प्रशासकीय पातळीवर निष्पक्ष चौकशी करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आदेश दिले आहे.




'त्या' शिबिरात नेमकं काय घडलं ?


खुटवडनगर परिसरातील संकटमोचन हनुमान मंदिर येथे महापालिकेच्या वतीने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस या शिबिरात दिली जात होती. श्रावणी पाटील ही देखील तिच्या वडिलांसोबत शिबिरात आली होती. माहितीनुसार, सर्पदंश व श्वानदंश प्रतिबंधक लस (Preventive vaccine) घेण्यासाठी श्रावणी तिथे आल्याची प्राथमिक माहिती आहे.


लस टोचल्यानंतर काही मिनिटांतच श्रावणी जवळच असलेल्या एका मेडिकल दुकानाकडे जात असताना अचानक तिला तीव्र चक्कर आली आणि ती भर रस्त्यावर कोसळली. रस्त्यावर कोसळताना तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे. घडलेला प्रकार बघताच तिथे उपस्थित नागरिकांनी आणि तिच्या वडिलांनी तातडीने श्रावणीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (Medical Officers) तपासणी केल्यानंतर तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.




लसीकरणाचा स्लॉट तत्काळ स्थगित करण्याचे निर्देश


दरम्यान, घटना घडल्यानंतर खुटवडनगर येथील लसीकरण केंद्रावरील सुरू असलेला लसीकरणाचा स्लॉट तत्काळ स्थगित करण्याचे कडक निर्देश दिले. तसेच वैद्यकीय आणि प्रशासकीय पातळीवर निष्पक्ष चौकशी करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आदेश दिले असून, चौकशीत प्रशासनाचा किंवा डॉक्टरांचा कोणताही हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित दोषींवर थेट कठोर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आमदार सीमा हिरे यांनी दिले आहेत.


दरम्यान ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक (Forensic Report) आणि अंतिम वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे वैद्यकीय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संपूर्ण नाशिककरांचे लक्ष आता शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे. मयत श्रावणीच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

Comments
Add Comment

Best Budget Bike : दिखाऊपणा कशाला? ७० किमी मायलेज आणि ५५ हजारांपासून किंमत; बजेटमधील ५ सर्वोत्तम बाईक!

सध्याच्या काळात महागाई आणि सतत वाढणारे इंधनाचे दर यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरि

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Panchkula Murder Case : पंचकुलात खळबळ! मोलकरणीनेच केली रिटायर्ड कॅप्टनच्या पत्नीची हत्या; सीसीटीव्हीमुळे बिंग फुटले

Haryana : हरियाणामधील पंचकुला येथे घडलेल्या एका थरारक आणि खळबळजनक हत्याप्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Eknath Shinde : 'शिवसेना कोणाची?' जनतेनेच दिला कौल; ४० चे ६० आमदार करून जनतेने शिक्कामोर्तब केलं

मुंबई : शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी