Devendra Fadnavis : केतन अग्रवाल खटल्यात उज्ज्वल निकम यांची एन्ट्री

 प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश


मुंबई : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांडाचा खटला आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. या संवेदनशील प्रकरणात गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले आहेत. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनीही या खटल्याचे काम पाहण्यासाठी आपली संमती दर्शवली आहे.



केतन अग्रवाल(Keatn agrawal) यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी शुक्रवारी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मुलासाठी न्याय मागितला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाला धीर देत, "दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्यांना फाशीचीच शिक्षा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे," अशी ग्वाही दिली. अग्रवाल कुटुंबाने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात(Fast track court) चालवण्याची आणि उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची केलेली मागणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य करत विधि व न्याय विभागाच्या सचिवांना यासंबंधीचे आदेश जारी करण्याचे निर्देश दिले.



२६ वर्षीय तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याचा १८ जून २०२६ रोजी लोहगड किल्ल्याच्या खोल दरीत कोसळून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचण्यात आला होता, परंतु पुणे पोलिसांनी केलेल्या सखोल तांत्रिक तपासानंतर यामागील हत्येचा कट उघडकीस आला. केतन अग्रवाल यांचा साखरपुडा सिया गोयल हिच्याशी झाला होता आणि नोव्हेंबर २०२६ मध्ये त्यांचा विवाह होणार होता. मात्र, सियाचे चेतन चौधरी नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. कुटुंबाच्या भीतीपोटी पळून जाण्याऐवजी या दोघांनी केतनलाच कायमचे वाटेतून हटवण्याचा क्रूर कट रचला. १८ जून रोजी सिया केतनला घेऊन लोहगड किल्ल्यावर गेली. तिथे चेतन आधीपासूनच दबा धरून बसला होता. सियाने इशारा करताच चेतनने केतनला मागून खोल दरीत ढकलून दिले.

पोलीस तपासात समोर आलेल्या बाबी


केतनला मारण्याचा हा त्यांचा पहिला प्रयत्न नव्हता. यापूर्वीही त्यांनी अनेकदा कट रचला होता. एका ट्रेक दरम्यान सियाने केतनला दरीच्या दिशेने ढकलले होते, मात्र केतन झाडाझुडपांचा आसरा मिळाल्याने सुदैवाने वाचला. त्या वेळी सियाने 'तुला सापापासून वाचवण्यासाठी ढकलले' अशी खोटी कहाणी रचून केतनचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा केलेला प्रयत्नही अयशस्वी ठरला होता, मात्र १८ जून रोजी त्यांचे प्रयत्न सफल झाले.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा