Shrikant Shinde : शिवसेनेला केंद्रात आणखी दोन मंत्रिपदे?

एक कॅबिनेट, एक राज्यमंत्रीपद; श्रीकांत शिंदेंसह पाच नावांची चर्चा, राष्ट्रवादीलाही मिळणार वाटा


मुंबई : उबाठा गटाच्या ६ खासदारांना आपल्या गोटात खेचून 'ऑपरेशन टायगर' यशस्वी करणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद दिल्ली दरबारात वाढली आहे. त्यामुळे त्यांना संख्याबळानुसार केंद्रात अतिरिक्त दोन मंत्रिपदे दिली जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यात एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रीपदाचा समावेश असेल. त्यासाठी शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांच्यासह पाच नावांची चर्चा आहे. त्याचप्रमाणे या फेरबदलात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही सामावून घेतले जाईल, असेही समजते. येत्या २८ किंवा २९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.



सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून ६ मंत्री आहेत, ज्यामध्ये भाजपचे ४, शिवसेनेचा १ (प्रतापराव जाधव - राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार) आणि आरपीआयच्या रामदास आठवले यांचा समावेश आहे. मात्र, उबाठा गटाच्या ६ खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे संसदेत शिवसेनेचे बळ वाढले आहे. याच कामगिरीचे बक्षीस म्हणून शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपद दिले जाण्याची चर्चा आहे. या पदासाठी कल्याणचे तरुण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. त्यांच्यासोबतच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचेही नाव राज्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे.


दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM NARENDRA MODI) यांच्या शपथविधीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ऑफर करण्यात आले होते. मात्र, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आधी कॅबिनेट मंत्रिपद भूषविलेले असल्याने राष्ट्रवादीने 'कॅबिनेट' पदाचा आग्रह धरत ती ऑफर नाकारली होती. आता मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचा हा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. अजित पवार गटाकडून राज्यसभेचे खासदार आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे नाव कॅबिनेटसाठी निश्चित मानले जात आहे. काही कारणास्तव त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावाचा समावेश होऊ शकेल.




प्रतापराव जाधवांचे खाते बदलणार?


- या संभाव्य फेरबदलात शिवसेनेचे विद्यमान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव(Prataaprov Jadhav) यांच्याकडील खात्यात बदल होण्याची चिन्हे आहेत. सध्या त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार आणि आरोग्य मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून आरोग्य राज्यमंत्रीपद काढून घेतले जाऊ शकते, मात्र आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार कायम राहील. हे आरोग्य राज्यमंत्रीपद शिवसेनेच्या अन्य खासदाराला दिले जाईल.
- दुसरीकडे, उबाठा गटातून अलीकडेच शिवसेनेत दाखल झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांचेही नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, मुंबईत त्यांनी पत्रकारांना केलेली जाहीर शिवीगाळ आणि धमकावण्याच्या प्रकरणामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली असून, हायकमांड त्यांच्या नावाबाबत नाराज असल्याचे समजते. त्यामुळे त्यांची संधी हुकल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने

Women's Reservation Bill : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची केंद्र सरकारची तयारी; किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : परिसीमन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षणाशी (Women's Reservation Bill) संबंधित महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांवर केंद्र

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम