Nashik Kumbh Mela : सिंहस्थपूर्वी नाशिक अग्निशमन दलाची ताकद वाढणार, १८.३० कोटींच्या निधीतून १२ अत्याधुनिक वाहनांची खरेदी

Nashik Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेचा अग्निशमन विभाग (Nashik Municipal Corporation's Fire Department) अधिक सक्षम आणि सज्ज होणार आहे. आपत्कालीन परिस्थितींना जलद प्रतिसाद देण्यासाठी विभागाच्या ताफ्यात १२ अत्याधुनिक अग्निशमन वाहनांची भर पडणार असून त्यासाठी १८ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. महापालिकेने पुण्यातील हायटेक कंपनीकडून या वाहनांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व वाहने ऑक्टोबर महिन्यापर्यंत नाशिकमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. सध्या विभागाकडे ३७ वाहने असून त्यापैकी १५ वाहने कालबाह्य झाल्याने नवीन वाहनांची गरज निर्माण झाली होती.



सिंहस्थ काळात लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच अनुषंगाने अग्निशमन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशी नऊ मोठी अग्निशमन वाहने आणि तीन रॅपिड इंटरव्हेन्शन व्हेईकल (आरआयव्ही) खरेदी करण्याचे नियोजन केले आहे.शहराचा वाढता विस्तार, नव्याने विकसित होणारे निवासी व व्यावसायिक भाग आणि वाढत्या आपत्कालीन घटनांच्या पार्श्वभूमीवर ही वाहने महत्त्वाची भूमिका बजावतील. नव्या वाहनांमुळे घटनास्थळी कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार असून बचावकार्य अधिक परिणामकारक होईल. परिणामी जीवित व वित्तहानी टाळण्यास मोठी मदत मिळणार आहे.



आगींवर त्वरित नियंत्रणासाठी आरआयव्ही उपयुक्त


नाशिकमधील अनेक अरुंद रस्ते, गल्ल्या आणि दाट लोकवस्तीच्या भागांत मोठ्या अग्निशमन वाहनांना पोहोचताना अडचणी येतात. त्यामुळे आग नियंत्रणात आणण्यास विलंब होण्याची शक्यता असते. नव्याने दाखल होणारी तीन रॅपिड इंटरव्हेन्शन व्हेईकल अशा ठिकाणी जलदगतीने पोहोचून तातडीची मदत आणि आग नियंत्रणाचे काम प्रभावीपणे करू शकणार आहेत.



ऑक्टोबरपर्यंत सर्व वाहने ताफ्यात दाखल होतील


सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी १२ अत्याधुनिक वाहनांची खरेदी केली जात आहे. ऑक्टोबरपर्यंत ही सर्व वाहने ताफ्यात दाखल होतील. भविष्यातील आपत्कालीन परिस्थितींमध्येही त्यांचा मोठा उपयोग होणार आहे."
संजय बैरागी, अग्निशमन अधिकारी, मनपा

Comments
Add Comment

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाहीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत (Maratha Community's Demands) राज्य शासन सकारात्मक असून, विविध प्रशासकीय विभागांकडे

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,