Nashik : नाशिकच्या दोन महत्त्वाच्या रुग्णालयांसाठी पदनिर्मितीस शासनाची मंजुरी, आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्याला यश

Nashik : नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयातील (Sandarbh Services Hospital) पेडियाट्रिक, न्युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी व अर्भक अतिदक्षता विभाग (NICU) सुरू करण्यासाठी १०५ खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. तसेच १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून ही दोन्ही रुग्णालये लवकर कार्यान्वित व्हावीत यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता.


या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने २४ जून २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाद्वारे ५० टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नव्या व श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मितीस मंजुरी दिली आहे.या निर्णयानुसार संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक येथे कर्करोग, न्युरोसर्जरी, हृदयरोग, प्लास्टिक सर्जरी, क्ष-किरण, शरीरविकृती, शुश्रूषा व विविध अवैद्यकीय विभागांसाठी एकूण ९५ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे.



तसेच १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, परिचारिका, तंत्रज्ञ तसेच प्रशासकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांची ९७ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.या पदनिर्मितीमुळे दोन्ही रुग्णालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होऊन अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी नाशिक शहर व जिल्ह्यातील महिला, बालक आणि गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना मुंबई-पुण्यासारख्या महानगरांवर अवलंबून राहावे लागणार नाही.


शासनाच्या या निर्णयाबद्दल आमदार फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांचे आभार मानले असून दोन्ही रुग्णालये लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी पुढील पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर