Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरेंचा एकत्र विमान प्रवास

ऑपरेशन टायगर’नंतरची पहिलीच भेट



मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही, असे म्हणतात. उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्याची घटना ताजी असतानाच, शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav thakre) यांनी एका विमानातून प्रवास केला. मुंबई ते नागपूर प्रवासात या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याचे कळते.



६ खासदार फुटल्यानंतर पक्ष सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संबंधित लोकसभा मतदारसंघांचे दौरे करण्याचे निश्चित केले आहे. २७ जून रोजी त्यांचा यवतमाळ-वाशिम दौरा असून, याच दौऱ्यासाठी ते मुंबईहून नागपूरला जात होते. योगायोगाने, याच विमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील नागपूरला रवाना होत होते. उद्धव ठाकरे समोर येताच, कटुता बाजूला ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत खिलाडूवृत्तीने त्यांची विचारपूस केली. "आपण भेटलो हीच मोठी बातमी आहे," असा टोला फडणवीसांनी लगावताच तिथे उपस्थित नेत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.



२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युती म्हणून लढूनही उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी स्थापन करत वेगळा रस्ता धरला. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वितृष्ठ जगजाहीर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘ऑपरेशन टायगर २.०(Opretion tigar 2.0)’ राबवून उबाठा गटाचे नऊपैकी सहा खासदार आपल्या गळाला लावले. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अशा रीतीने आमनेसामने आले. या प्रवासात उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई देखील उपस्थित होते.

Comments
Add Comment

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाहीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत (Maratha Community's Demands) राज्य शासन सकारात्मक असून, विविध प्रशासकीय विभागांकडे

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून