Friday, June 26, 2026

Deool Band 2 Box Office Collection : 'देऊळ बंद २'ने गाठला १०० कोटींचा टप्पा; दिग्पाल लांजेकर यांची खास पोस्ट!

Deool Band 2 Box Office Collection : 'देऊळ बंद २'ने गाठला १०० कोटींचा टप्पा; दिग्पाल लांजेकर यांची खास पोस्ट!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी (Marathi Film Industry) अभिमानाची बातमी समोर आली आहे. 'देऊळ बंद २' (Deool Band 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) दमदार कामगिरी करत १०० कोटी रुपयांच्या (₹100 Crore Club) कमाईचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. 'सैराट' आणि 'राजा शिवाजी'नंतर हा विक्रम करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत आता 'देऊळ बंद २'चाही समावेश झाला आहे.

अवघ्या १० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये (Budget) तयार झालेल्या या चित्रपटाने काहीच दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमवत मराठी चित्रपटसृष्टीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, २०२६ मधील सर्वाधिक कमाई (Highest Grossing Marathi Film of 2026) करणारा मराठी चित्रपट ठरण्याचा मानही 'देऊळ बंद २'ने मिळवला आहे. तसेच या चित्रपटाने 'क्रांतिज्योती विद्यालय' या चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.

दिग्पाल लांजेकर यांची खास पोस्ट

दिग्दर्शक (Director) दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत चित्रपटाच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले, "'देऊळ बंद २'ने १०० कोटींचा टप्पा पूर्ण केला ही केवळ कमाईची बातमी नाही, तर आपल्या मातीतल्या कथा, कलाकार आणि प्रेक्षकांनी मराठी सिनेमावर ठेवलेल्या विश्वासाचा हा विजय आहे." त्यांनी या यशाबद्दल प्रवीण तरडे यांचेही अभिनंदन केले.

 
View this post on Instagram
 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

'देऊळ बंद २' हा चित्रपट श्रद्धा, अंधश्रद्धा आणि नास्तिकता या संवेदनशील विषयांवर भाष्य करतो. चित्रपटाचे दिग्दर्शन (Direction) प्रवीण तरडे यांनी केले आहे. चित्रपटात स्नेहल तरडे यांनी 'संगीता' ही भूमिका साकारली आहे. शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी संगीता संकटांमुळे देवावरचा विश्वास गमावते आणि नास्तिक बनते. त्यानंतर श्री स्वामी समर्थ (मोहन जोशी) सामान्य व्यक्तीच्या रूपात तिच्या आयुष्यात येतात आणि संवादातून आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा मार्ग नसून बदलत्या काळानुसार शेती आणि विचारांमध्ये बदल आवश्यक असल्याचा प्रभावी संदेश देतात.

चित्रपटातील स्नेहल तरडे यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या साकारलेल्या भूमिकेने अनेक प्रेक्षकांना भावूक केले आहे. त्याचबरोबर प्रवीण तरडे यांच्या दमदार अभिनयासह त्यांच्या प्रभावी दिग्दर्शनाचेही प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून कौतुक होताना दिसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >