२०१८ मध्ये सुरू झालेल्या 'मिर्झापूर'च्या प्रवासाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली. आता या गाजलेल्या मालिकेची कथा चित्रपटाच्या माध्यमातून आणखी मोठ्या आणि भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
मुंबई : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज जोडणी आणि सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन ...
टीझरमध्ये अली फजल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू यांची दमदार झलक पाहायला मिळते. विशेष म्हणजे, 'बबलू पंडित'ची भूमिका साकारणारा दिव्येंदू पुन्हा एकदा या विश्वात परतताना दिसत आहे. याशिवाय अभिनेता रवी किशन यांचीही दमदार उपस्थिती कथेला नवा आयाम देताना दिसते.
'मिर्झापूर: द मुव्ही'ची कथा पूर्वांचलच्या गल्लीबोळांपासून राजस्थानच्या वाळवंटांपर्यंत विस्तारलेली दिसणार आहे. चित्रपटात अॅक्शन, सत्ता संघर्ष, सूड आणि राजकारणाचा तडका अधिक भव्य स्वरूपात पाहायला मिळणार असल्याचे टीझरवरून स्पष्ट होते.
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर बुधवार २४ जून रोजी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. एअर इंडिया आणि इंडिगोची दोन ...
View this post on Instagram
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मिर्झापूर: द मुव्ही' हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपट हिंदीसोबतच तेलुगू भाषेतही रिलीज केला जाणार आहे.
टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत असून, 'मिर्झापूर'चे जग पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






