State Schools : राज्यातील शाळांमध्ये मूलभूत सुविधांसाठी ६ महिन्यांची मुदत : डॉ. पंकज भोयर

मुंबई : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज जोडणी आणि सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळांना ६ महिन्यांची मुदत देण्यात येईल, अशी घोषणा प्रभारी मंत्री डॉ. पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांनी आज विधानपरिषदेत (Legislative Council) प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली. शाळांमधील या सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शासन पुन्हा एकदा नवीन आणि सर्वसमावेशक सर्वेक्षण करणार असल्याचेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.



विधानपरिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सन्माननीय सदस्या श्रीमती चित्रा वाघ, श्री. प्रवीण दरेकर, श्री. प्रसाद लाड आणि श्री. किशोर दराडे यांच्यासह इतर आमदारांनी राज्यातील शाळांमधील मूलभूत सुविधांच्या दुरवस्थेबाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील हजारो शाळांमध्ये आजही मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याचे आमदारांनी निदर्शनास आणून दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानंतरही वयात येणाऱ्या मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन्स आणि इन्सिनरेटर (नष्ट करणारी यंत्रणा) अनेक शाळांमध्ये कार्यान्वित नसल्याबद्दल आमदारांनी तीव्र चिंता व्यक्त केली. राज्यातील ३ हजार ३२८ शाळांमध्ये अद्याप वीज जोडणी नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी व अनुदानित शाळांवर ३ महिन्यांची नोटीस देऊन कडक कारवाई करणार का आणि त्यांचे अनुदान रोखणार का, असा थेट प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारत शिक्षण विभागाच्या कागदोपत्री आकडेवारीवर असमाधान व्यक्त केले.


यावर उत्तर देताना प्रभारी मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. युडायस (U-DISE) पोर्टलवर शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी भरलेल्या माहितीनुसार शासकीय शाळांमध्ये ९९.५९ टक्के, अनुदानित शाळांमध्ये ९९.८८ टक्के तर विना-अनुदानित शाळांमध्ये ९९.७२ टक्के मुलींसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध असल्याचे आकडेवारी सांगते. मात्र, प्रत्यक्ष आणि कागदोपत्री परिस्थितीतील तफावत दूर करण्यासाठी शासन नव्याने सर्वेक्षण करेल. अनेकदा ३ महिन्यांच्या अल्प कालावधीत बांधकाम पूर्ण करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होत नसल्याने, शाळांना या सर्व सुविधा पूर्ण करण्यासाठी ६ महिन्यांचा वाढीव कालावधी देण्यात येत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. तसेच या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली.



जिल्हा नियोजन समिती (DPDC), सेस निधी, मनेरेगा, समाज कल्याण विभाग आणि कॉर्पोरेट कंपन्यांचा सीएसआर (CSR) निधी या सर्व उपलब्ध माध्यमांचा समन्वय साधून शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. सर्व लोकप्रतिनिधींनी देखील आपापल्या जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांमध्ये पालक मंत्र्यांच्या निदर्शनास हा विषय आणून या कामांना गती द्यावी, असे आवाहनही मंत्र्यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास