FIFA World Cup 2026 : वर्ल्ड कप दरम्यान फिफाची कडक कारवाई! या आशियाई देशावर घातली बंदी !!!

फ्रान्स : फिफा वर्ल्ड कप २०२६ चे अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांनी संयुक्तपणे आयोजन केले आहे. स्पर्धेतील राउंड ऑफ ३२ हा महत्त्वाचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. स्पर्धेतील बहुतेक साखी सामने झाले आहेत आणि निवडक देश राउंड ऑफ ३२ साठी पात्र झाले आहेत. काही देश पात्रतेच्या उंबरठ्यावर आहेत. स्पर्धेत रोमांचक वातावरण असताना आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने नेपाळच्या फुटबॉल टीमवर बंदी घातली आहे. तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाचे कारण देत फिफाने ही कारवाई केली आहे.





नेमकं प्रकरण काय ?


फिफाने नेपाळवर बंदी घालण्याबाबत एक निवेदन जारी केले आहे. यात फिफाने स्पष्ट सांगितले आहे की, २४ जून २०२६ रोजी फिफा कौन्सिलच्या ब्युरोने पासून पुढील सूचना मिळेपर्यंत फिफाच्या नियमावलीच्या कलम १३ अंतर्गत नेपाळमधील ऑल नेपाळ फुटबॉल असोसिएशनच्या कामकाजात बाह्य हस्तक्षेप होत असल्याचे आढळून आल्यामुळे कारवाई केली आहे. या निर्णयामुळे नेपाळला आंतरराष्ट्रीय फुटबॉलशी (Nepal International football) संबंधित कोणत्याही स्पर्धा, कार्यक्रम किंवा उपक्रमांमध्ये सहभागी होता येणार नाही. तसेच नेपाळी फुटबॉल संघ, क्लब आणि अधिकारी यांच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. फिफाने स्पष्ट केले आहे की, नेपाळच्या कारभारातील तृतीय पक्षाचा हस्तक्षेप पूर्णपणे हटवून संघटना स्वतंत्रपणे कार्यरत असल्याची खात्री झाल्यानंतरच हे निलंबन उठवण्याबाबत विचार केला जाईल.तोपर्यंत हा बंदी आदेश कायम राहणार आहे.



नेपाळ फुटबॉल नेहमी वादांच्या भोवर्‍यात


नेपाळ फुटबॉलचा हा वाद केवळ आताचाच नसून, या खेळाला अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराची आणि गैरव्यवहाराची कीड लागली आहे. यापूर्वी २०१५ मध्ये नेपाळ फुटबॉलचे माजी अध्यक्ष गणेश थापा यांच्यावर फिफाने निवडणुकीत लाच घेतल्याप्रकरणी आणि निधीचा अपहार केल्याप्रकरणी १० वर्षांची मोठी बंदी घातली होती, जी नुकतीच एप्रिल २०२५ मध्ये संपली. याच काळात, म्हणजेच २०१५ मध्ये, नेपाळ फुटबॉलला मॅच-फिक्सिंगच्या एका मोठ्या काळ्या डागाने हादरवून सोडले होते. तत्कालीन कर्णधार सागर थापासह पाच प्रमुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सट्टेबाजांकडून पैसे घेऊन देशाचे सामने फिक्स केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, ज्यांच्यावर आशियाई फुटबॉल महासंघाने (AFC) आजीवन बंदी घातली आहे.या गंभीर आर्थिक गैरव्यवहार आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे फिफाने २०२१ ते २०२४ या काळात नेपाळ फुटबॉल असोसिएशनच्या निधीवर कडक निर्बंध (Control Funding) लादले होते. त्याआधी, २००१ ते २००३ दरम्यानही नेपाळ सरकार आणि फुटबॉल संघटना यांच्यातील अंतर्गत वादामुळे देशातील फुटबॉल पूर्णपणे ठप्प झाला होता. या सातत्यपूर्ण गैरव्यवस्थापनामुळे नेपाळमधील 'अ-डिव्हिजन' सारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय लीग स्पर्धा वेळेवर होऊ शकल्या नाहीत. परिणामी, उत्पन्नाचे साधन न उरल्याने गेल्या काही वर्षांत नेपाळचे शेकडो प्रतिभावान खेळाडू फुटबॉल सोडून नोकरीसाठी ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. आता २०२६ मध्ये झालेल्या या नवीन निलंबनामुळे नेपाळी फुटबॉल पूर्णपणे अंधारात सापडला आहे.

Comments
Add Comment

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत ICC चा बडगा सुरूच; खात्यात जमा झाला डिमेरिट पॉईंट

Colombo : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने जर्सीवर टेप लावून तो नंबर का लपवला? चाहतेही चक्रावले, उलटसुलट चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या दुलीप ट्रॉफीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे. अवघ्या १५