कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा
मुंबई दि. २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिके तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली असून यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, नुकसानग्रस्तांना वेळेत आधार मिळावा आणि शेती पुनर्बांधणीला बळ मिळावे, या भूमिकेतून मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद जाधव-पाटील(makrand jadhav-patil) यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय मार्गी लागला आहे.शासन निर्णयानुसार राज्यातील २ लाख ६७ हजार ६५६ शेतकरी आणि १ लाख ६३ हजार ७८८.७५ हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले असून त्यांच्यासाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे.
अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील १,४७६ शेतकरी, ७५७.३१ हेक्टर क्षेत्रासाठी ९६.२६ लाख रुपये, तर बुलढाणा जिल्ह्यातील १२,०५२ शेतकरी, ६,७८८.६३ हेक्टर क्षेत्रासाठी १८ कोटी ९० लाख ३९ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे. या विभागातील एकूण १३,५२८ शेतकरी व ७,५४५.९४ हेक्टर क्षेत्रासाठी १९ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मुंबई : ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धमकी दिल्याचा आणि जाहीरपणे शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर ...
नागपूर विभागातील भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील एकूण १४,६१३ शेतकरी व ८,१६०.५३ हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी ३४ लाख ९७ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे.छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील २,५०६ शेतकरी व १,९२३.२० हेक्टर क्षेत्रासाठी २ कोटी २ लाख ७९ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे.नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील एकूण १ लाख २९ हजार ८९६ शेतकरी व ५५ हजार ५५५.९० हेक्टर क्षेत्रासाठी १०३ कोटी ३२ लाख ७७ हजार रुपये मदत मंजूर झाली आहे.कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तब्बल १ लाख ३६ हजार ७५१ शेतकरी व ९२ हजार ३६२.७८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यांच्यासाठी २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मदतीत आंबा व काजू फळबागांच्या नुकसानीचा मोठा वाटा असून कोकण विभागासाठी मंजूर करण्यात आलेला हा निधी राज्यातील सर्वाधिक आहे. त्यामुळे हजारो आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ३,७६२ शेतकरी व २,२४१.३० हेक्टर क्षेत्रासाठी ४ कोटी ३१ लाख १ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे.
- १०८ वर्षांचा वारसा असलेल्या आय.ई.एस. (IES) संस्थेला मुंबईत खाजगी कौशल्य विद्यापीठ सुरू करण्यास मंजुरी. - राज्यातील आयटीआयच्या कायापालटासाठी ₹४,००० ...
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची गंभीर दखल घेत मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद जाधव-पाटील यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी विशेष पाठपुरावा केला. पंचनामे, प्रस्ताव सादरीकरण आणि निधी मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी यासाठी त्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले होते. त्यामुळे अल्पावधीतच मदतीचा प्रस्ताव शासन स्तरावर मंजूर होऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मार्ग मोकळा झाला.नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेत नामदार मकरंद जाधव-पाटील यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत देणे नव्हे, तर त्यांना पुन्हा उभारी देऊन शेती पुनर्बांधणीसाठी सक्षम करणे हे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सातत्याने अधोरेखित केले आहे.
विशेषतः कोकण विभागातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत त्यांच्या मदतीसाठी स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या सकारात्मक आणि संवेदनशील भूमिकेचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. राज्यातील प्रत्येक बाधित शेतकऱ्याला न्याय मिळावा, कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये आणि संकटाच्या काळात शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, हीच भूमिका त्यांनी सातत्याने मांडली आहे. अवकाळी पावसाच्या संकटानंतर शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देत राज्य शासनाने मंजूर केलेला हा निधी केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांच्या पुनर्बांधणीचा भक्कम आधार ठरणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद जाधव-पाटील यांच्या संवेदनशील, परिणामकारक आणि शेतकरीकेंद्री नेतृत्वामुळे हा निर्णय वेगाने मार्गी लागला असून राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांमध्ये नव्या आशेचा आणि विश्वासाचा संदेश पोहोचला आहे.
शिवसेना महिला सेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई, दि. २५ जून २०२६ : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ...
प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर केवळ एका दिवसात निधी मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने शासनाच्या निर्णयक्षमतेची, प्रशासकीय गतिमानतेची आणि शेतकरी हिताबाबतच्या संवेदनशीलतेची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्याच्या दृष्टीने मदत व पुनर्वसन विभागाने विक्रमी गतीने निर्णय घेतल्याचे या प्रक्रियेतून स्पष्ट झाले.राज्यातील कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, संकटग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक आधार मिळावा आणि शेती पुनर्बांधणीला बळ मिळावे, या सकारात्मक व शेतकरीकेंद्री भूमिकेतून नामदार मकरंद जाधव-पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे कोकणातील हजारो आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे .





