विलेपार्लेच्या जीवनतारा सोसायटीची फसवणूक; विकासकावर गुन्हा दाखल करण्याची विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांची मागणी

मुंबई : विलेपार्ले येथील ६० वर्षे जुन्या असलेल्या 'जीवनतारा' सोसायटीच्या पुनर्विकासात विकासकाने सदनिकाधारकांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रिजेंट डेव्हलपर कवल वोरा या विकासकाने सदनिकाधारकांकडून जीएसटीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे ३ कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. या प्रकरणाची दखल घेत दोषी विकासकावर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि सदनिकाधारकांना त्यांच्या घरांचा ताबा मिळवून द्यावा, अशी मागणी दरेकर यांनी विधानपरिषदेत केली.



जीएसटीच्या नावाखाली वसुलीचा जाच


विधानपरिषदेत वस्तू व सेवा कर (GST) सुधारणा विधेयकावर बोलताना आमदार दरेकर (MLA Darekar) यांनी या फसवणुकीचा पाढा वाचला. पुनर्विकास प्रकल्पात मूळ सदनिकाधारकांना जीएसटीतून सूट असल्याचे कायद्याने स्पष्ट असतानाही, संबंधित विकासकाने सदनिकाधारकांना जीएसटीचे प्रत्येकी ७ लाख रुपये भरण्याची सक्ती केली. ही रक्कम न देणाऱ्या सभासदांना घराचा ताबा नाकारून त्यांना दोन वर्षांपासून हक्काच्या घरापासून वंचित ठेवले आहे. ज्यांनी भीतीपोटी ही रक्कम भरली, त्यांच्याकडूनही विकासक आता व्याजाची मागणी करत असल्याचे दरेकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.



स्वयं पुनर्विकासाच्या अडचणींवरही भाष्य


दरेकर यांनी स्वयं पुनर्विकासात सोसायट्यांना येणाऱ्या अडचणींचाही आढावा घेतला. ते म्हणाले की, "स्वयं पुनर्विकासाचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) माझ्या अध्यक्षतेखाली एक गट नेमला होता. २०१९ मध्ये शासनाने सवलतींचा निर्णय घेतला असला तरी त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही." सध्याच्या नियमांनुसार आर्किटेक्ट, वकील आणि कंत्राटदारांच्या फीवर १८ टक्के, बांधकाम साहित्यावर १८ टक्के आणि विक्रीच्या फ्लॅट्सवर ५ टक्के जीएसटी भरावा लागत असल्याने स्वयं पुनर्विकास प्रकल्प आर्थिक बोज्याखाली दबले आहेत. अभ्यास गटाने सुचविलेल्या शिफारशी तातडीने लागू केल्यास हे प्रकल्प जीएसटीच्या कचाट्यातून मुक्त होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



राज्यमंत्र्यांचे बैठकीचे आश्वासन


सदनिकाधारकांच्या फसवणुकीचा हा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचे मान्य करत, यावर तातडीने मार्ग काढण्यासाठी जीएसटी आयुक्तांसोबत आपल्या दालनात विशेष बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी दिले.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून