ह्युस्टन : ह्युस्टन येथे झालेल्या फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) च्या 'गट K' (Group K) सामन्यात पोर्तुगालने उझबेकिस्तानचा ५-० असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. सलामीच्या सामन्यात डीआर काँगोविरुद्ध बरोबरी झाल्यानंतर पोर्तुगालने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ खेळला आणि प्रतिस्पर्धी संघाला कोणतीही संधी दिली नाही.
पोर्तुगालकडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) ६ व्या आणि ३९ व्या मिनिटाला दोन गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. याशिवाय नुनो मेंडेसने १७व्या मिनिटाला शानदार फ्री किक (Free Kick) वर गोल केला, तर ६० व्या मिनिटाला उझबेकिस्तानचा गोलरक्षक नेमाटोव्हकडून ओन गोल (Own Goal) झाला. सामन्याच्या अखेरीस राफा लिओने ८७ व्या मिनिटाला गोल करत पोर्तुगालचा ५-० असा विजय निश्चित केला. या विजयासह पोर्तुगालने चार गुणांसह गटात अव्वल स्थान पटकावले. उझबेकिस्तानचा अझीझजॉन गनीव याने एक गोल केला होता, मात्र फाऊल (Foul) झाल्याने पंचांनी तो अमान्य केला.
नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ...
रोनाल्डोचा ऐतिहासिक विक्रम
या सामन्यातील पहिल्या गोलसह ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) सहा वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा पहिला खेळाडू ठरला. याशिवाय दुसरा गोल करत रोनाल्डोने विश्वचषकातील आपल्या गोलांची संख्या १० वर नेली. त्यामुळे त्याने पोर्तुगालचा महान खेळाडू युसेबियोचा ९ गोलचा विक्रम मोडीत काढत विश्वचषकात पोर्तुगालसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला.
वयाच्या ४१ वर्षे असताना विश्वचषकात गोल करणारा रोनाल्डो हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. या यादीत कॅमेरूनच्या रॉजर मिला यांचा पहिला क्रमांक आहे. त्यांनी १९९४ च्या विश्वचषकात ४२ वर्षे वयात गोल केला होता. सामन्यातील शानदार कामगिरीबद्दल रोनाल्डोला 'प्लेअर ऑफ द मॅच' (Player of the Match) पुरस्काराने गौरवण्यात आले. विजयानंतर रोनाल्डो म्हणाला, "वैयक्तिक विक्रम आनंद देतात, पण माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघाचा विजय आणि आत्मविश्वास. संघाला यश मिळवून देणे हेच माझे अंतिम ध्येय आहे."





