Tuesday, June 23, 2026

Father Attacks Son : रक्ताच्या नात्याला काळिमा! मुलगा आणि सुनेवर जीवघेणा हल्ला

Father Attacks Son : रक्ताच्या नात्याला काळिमा! मुलगा आणि सुनेवर जीवघेणा हल्ला

सासऱ्याने सुनेच्या अंगावर घातली कार

Father Attacks Son : अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा (Tiwsa) शहरात कौटुंबिक वादातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. एका वडिलांनी आपल्या मुलगा आणि सुनेच्या अंगावर कार घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत सून गंभीर जखमी झाली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही  (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

कौटुंबित बाद

मिळालेल्या माहितीनुसार, जमा खान आणि त्यांच्या कुटुंबामध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. याच वादातून त्यांनी हॉटेलसमोर उभ्या असलेल्या मुलगा आणि सुनेच्या दिशेने भरधाव कार चालवल्याचा आरोप आहे. कार थेट त्यांच्या दिशेने गेल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. (Crime News)

या घटनेत सून अश्विनी खान यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या दोन्ही पायांना आणि कमरेला मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुलगा मात्र थोडक्यात बचावला. कारचा वेग इतका होता की वाहन थेट हॉटेलच्या कंपाउंडला धडकले. यामुळे हॉटेलचेही मोठे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये कार थेट मुलगा आणि सुनेच्या दिशेने येताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

सासऱ्यावर गुन्हा दाखल

घटनेनंतर अश्विनी खान यांनी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जमा खान यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (Car Attack Case)

दरम्यान, या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून जमा खान यांनीदेखील आपल्या मुलाविरोधात तक्रार दिली आहे. मुलाने शिवीगाळ केली आणि दगडफेक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद घेतली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा