Nashik Crime : नाशिकमध्ये पुन्हा खळबळ ; 'याठिकाणी' घराच्या टेरेसवर गोणीत आढळला मृतदेह

Nashik Crime : काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील तपोवन परिसरात सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच रविवारी सायंकाळी कामगारनगर परिसरात एका घराच्या टेरेसवर गोणीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. यानंतर स्थानिकांनी पाहणी केल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती.



घराच्या टेरेसवर गोणीत आढळला मृतदेह


काही दिवसापूर्वीच घडलेल्या एका घटनेनं शहरात खळबळ उडाली असतानाच शहरातील कामगारनगरातील साईबाबा मंदिराजवळील गल्लीत रविवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. परिसरातील नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली असता एका घराच्या टेरेसवर ठेवलेल्या एका गोणीत मृतदेह असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घाबरलेल्या स्थानिकांनी त्यानंतर तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली .( Nashik Crime News )



मृतदेहाची ओळख अद्याप अस्पष्ट


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी (Satpur Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृतदेहाची ओळख अद्याप अस्पष्ट असून तो काही दिवसांपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह गोणीत भरून टेरेसवर टाकण्यात आल्याने हा खूनाचा प्रकार असण्याची शक्यता असून पोलिसांकडून तपास केला जात आहे. ( Nashik Crime News )



परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी


पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून मृतदेह तेथे कसा आणण्यात आला, याचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ( Nashik Crime News )



या घटनेमुळे कामगारनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही महत्त्वाची माहिती असल्यास सातपूर पोलिसांशी (Satpur Police) संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे (Prakash Ahire) यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Fadnavis : 'माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल'

पुणे : माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब

Nalasopara News : नागेला तलाव पुन्हा ठरला जीवघेणा! 18 वर्षीय तरुणाचा बळी, सुरक्षेअभावी नागरिक आक्रमक

नालासोपारा : नालासोपारा पूर्व भागातील नागेला तलावात (Nagela Lake) बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक

Hrithik Roshan : ऑफिससाठी जागा भाड्याने देऊन अभिनेता हृतिक रोशन कमावतो अफाट पैसा

मुंबई : बॉलिवूडचे अनेक कलाकार सिनेसृष्टीतील अस्थिरतेचा विचार करून आर्थिक सुरक्षेसाठी विविध क्षेत्रांमध्ये

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! 'या' ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही

US Visa Bond Rule : ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय! आता US Visa साठी भरावा लागू शकतो १७ लाखांचा बॉण्ड

नवी दिल्ली : अमेरिकेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

Private Detectives : खासगी गुप्तहेरांवर येणार कायद्याचा वॉच! सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला मोठे निर्देश

नवी दिल्ली : देशभरात कार्यरत असलेल्या खासगी गुप्तहेर (Private Detectives) संस्थांवर कायदेशीर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त