Vidhan Bhavan : डिजिटल फेस रेकॉग्निशन' नसल्यास विधानभवनात उद्यापासून नो-एन्ट्री

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; सुनेत्रा पवारांसह अक्षय कर्डिले यांनी घेतली आमदारकीची शपथ


मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून मुंबईत सुरुवात झाली. या अधिवेशनात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि प्रसारमाध्यमकर्मींना प्रवेशासाठी 'डिजिटल फेस रेकॉग्निशन' (चेहरा पडताळणी) प्रणाली अनिवार्य करण्यात आली. पहिल्या दिवशी तांत्रिक गोंधळामुळे ओळखपत्र दाखवून अनेकांना प्रवेश देण्यात आले. मात्र, मंगळवारपासून (२३ जून) 'डिजिटल फेस रेकॉग्निशन' नसलेल्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याची घोषणा विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर, तर विधान परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली.



राष्ट्रगीत, वंदे मातरम्‌ आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानसभा आणि विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. बारामतीमधील पोटनिवडणुकीद्वारे विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अक्षय कर्डिले यांनी विधानसभेच्या सभागृहात सदस्यत्वाची व गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व प्रमुख मंत्री उपस्थित होते.


दुसरीकडे, विधानपरिषदेचे कामकाज सुरू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नव्याने प्रवेश केलेल्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा अधिकृत परिचय करून दिला. यामध्ये डॉ. नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, अंबादास दानवे, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे या नेत्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे सभागृहात स्वागत करत त्यांच्या पुढील संसदीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात कला क्षेत्रातील दिग्गजांसह दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पद्मविभूषण आशा भोसले आणि पद्मभूषण सुमन कल्याणपूर, तसेच विधानसभेचे माजी सदस्य व माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर-पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या लंगडा मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, श्रीमती उषादेवी जगदाळे व श्रीमती शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला.

विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी
कामकाजाला सुरुवात होण्याआधी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर एकत्र येत "शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, तर सरसकट कर्जमुक्ती करा," अशी घोषणाबाजी करत आंदोलन केले. मात्र, विरोधकांच्या या आंदोलनाचा सत्ताधाऱ्यांवर कोणताही परिणाम झाला नाही. सरकारच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांचा समाचार घेतला. भरणे म्हणाले की, "महायुती सरकारने तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कदाचित सर्वच शेतकरी १०० टक्के समाधानी असतील असे आम्ही म्हणणार नाही, मात्र जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारने केला आहे, त्यामुळे विरोधकांनी स्टंटबाजी करू नये", असा टोलाही त्यांनी लगावला.

Comments
Add Comment

Nashik Crime News : ...'तर पहिला खून तुमचा होईल,' नाशिकमध्ये व्यापाऱ्यांना बिश्नोई गँगच्या नावाने धमकी

Nashik Crime News : नाशिकच्या महात्मा गांधी रोडवरील क्रीडा साहित्य आणि वाद्य विक्री करणाऱ्या दोन व्यापारी बंधूंना तब्बल २

Rajasthan School Audit Report : राजस्थानमधील ६११ सरकारी शाळांना स्वतःची इमारतच नाही; विधानसभेत ऑडिट रिपोर्ट सादर

राजस्थानमधील सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधांची अत्यंत दयनीय अवस्था विधानसभेत सादर करण्यात आलेल्या एका

Nashik Crime News : मोबाइलचे नेटवर्क गेले अन् खाते रिकामे झाले, नाशिकच्या कंत्राटदाराचे ५०.४७ लाख गायब

Nashik Crime News : नाशिकमधील एका कंत्राटदाराच्या मोबाइलचे नेटवर्क अचानक बंद पडल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांच्या बँक

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील

Nashik : वीजचोरीविरोधात महावितरणची धडक कारवाई, जिल्ह्यात एकाच दिवशी १४ जणांवर गुन्हे दाखल

Nashik : वीजचोरी करून व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरोधात महावितरणच्या (Mahavitran) नाशिक भरारी पथकाने धडक कारवाई केली असून,