Indian Navy : भारताच्या नौदल ताफ्यात तीन स्वदेशी युद्धनौकांचा समावेश वाढती क्षमता, आत्मनिर्भरता, आधुनिकीकरणाचे प्रतीक

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत रविवारी एकाच वेळी तीन अत्याधुनिक स्वदेशी जहाजांचा नौदल ताफ्यात समावेश करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरात आयएनएस अग्रय, आयएनएस दुनागिरी आणि आयएनएस संशोधक ही तीन जहाजे राष्ट्राला समर्पित केली. या तिन्ही जहाजांच्या समावेशामुळे भारताची सागरी सुरक्षा, देखरेख आणि युद्धक्षमता अधिक मजबूत होणार आहे.



आयएनएस संशोधक हे भारतीय नौदलाचे अत्याधुनिक सर्वेक्षण जहाज असून ते ‘संधायक’ श्रेणीतील चौथे आणि अंतिम जहाज आहे. खोल समुद्र तसेच किनारी भागांतील हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी हे जहाज विशेष तयार करण्यात आले आहे. कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स येथे तयार करण्यात आलेल्या या जहाजात ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. डिजिटल साइड-स्कॅन सोनार आणि स्वायत्त पाण्याखालील वाहनांसारख्या अत्याधुनिक उपकरणांनी ते सज्ज आहे. सुमारे ३,४०० टन वजनाचे हे जहाज शोध आणि बचाव मोहिमांसाठीही उपयुक्त ठरणार आहे.



आयएनएस दुनागिरी हे प्रोजेक्ट १७ए (नीलगिरी श्रेणी) अंतर्गत तयार करण्यात आलेले पाचवे स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौक आहे. या जहाजावर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो, मध्यम पल्ल्याची पृष्ठभाग-ते-हवा क्षेपणास्त्र प्रणाली तसेच पाणबुडीविरोधी रॉकेट प्रणाली बसवण्यात आली आहे. सुमारे ७५ टक्के स्वदेशी साहित्याने तयार झालेल्या या युद्धनौकेला उत्तराखंडमधील दुनागिरी शिखराचे नाव देण्यात आले आहे. हे जहाज हवाई, सागरी आणि पाण्याखालील धोक्यांचा सामना करण्यास सक्षम आहे. आयएनएस अग्रय हे अत्याधुनिक पाणबुडीविरोधी युद्धनौक असून उथळ पाण्यात शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांचा नाश करण्यासाठी ते तयार करण्यात आले आहे.



या जहाजाची निर्मितीही गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स येथे झाली असून, त्यात ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्य वापरण्यात आले आहे. सुमारे ७७ मीटर लांबीचे हे जहाज वॉटरजेट प्रणालीवर चालते. हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लाँचर आणि अत्याधुनिक सोनार प्रणालीमुळे त्याची क्षमता वाढली आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी या तिन्ही जहाजांच्या समावेशाचे स्वागत करताना सांगितले की, ही कामगिरी भारताच्या युद्धनौका निर्मितीतील आत्मनिर्भरता, आधुनिकीकरण आणि वाढत्या क्षमतेचे प्रतीक आहे. कोलकात्यातील हे दुसरे ‘ट्राय-कमिशनिंग’ असून, भारतीय नौदलाच्या भविष्यातील सागरी मोहिमांसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.




Comments
Add Comment

Alaska Plane Crash : अँकरेजवरून उडालेले सेसना चार्टर विमान दुर्गम भागात कोसळले; २ वैमानिकांसह ८ प्रवासींचा मृत्यू

अमेरिकेतील अलास्का प्रांतातील अत्यंत कठीण आणि बर्फाच्छादित परिसरात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. टेड

Kangana Ranaut vs Sharmila Tagore : 'वंदे मातरम' वादावर खासदार कंगना रणौतची शर्मिला टागोर यांच्यावर टीका : "कलेला धर्मात अडकवू नका"

राष्ट्रगीत 'वंदे मातरम'बद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री आणि

Mahadev Betting Scam : महादेव बेटिंग प्रकरणातील सौरभ चंद्राकर मोठे खुलासे करण्यास तयार? भारताकडे मागितले साक्षीदार संरक्षण

Mahadev Betting Scam : महादेव ऑनलाइन बेटिंग नेटवर्क प्रकरणातील कथित सूत्रधार सौरभ चंद्राकर याने या प्रकरणाशी संबंधित

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Ladakh Viral Incident : लडाखमधील वादावर २५ वर्षीय महिलेची माफी; “माझे बोलणे चुकीचे होते, लष्कराचा कायम आदर आहे”

लडाख : लडाखमधील एका रस्ता नाकेबंदी

Narayana Murthy : नारायण मूर्ती यांनी आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पत्नी सुद्धा मूर्तींसह दिली व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला