NEET परीक्षार्थ्यांसाठी BEST ची विशेष तयारी! २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बस, १८० फेऱ्यांचे नियोजन

मुंबई : मुंबईतील नीट (NEET - National Eligibility cum Entrance Test) परीक्षेला बसणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने (BEST) विशेष बस सेवेची घोषणा केली आहे. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना वेळेत आणि सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांवर पोहोचता यावे यासाठी शहरातील विविध भागांमध्ये २४ विशेष बस मार्गांवर एकूण ६० बसचे नियोजन करण्यात आले आहे. (BEST Bus)


बेस्ट प्रशासनाच्या माहितीनुसार, या विशेष सेवेद्वारे सुमारे १८० फेऱ्या चालविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बेस्ट बसच्या संपादरम्यान त्यांनी खास विद्यार्थ्यांसाठी ही सेवा सुरु केली आहे. (BEST Bus)



प्रमुख स्थानकांहून थेट परीक्षा केंद्रांपर्यंत सेवा :


विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कुर्ला, दादर, मलाड, मुलुंड यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांहून विविध परीक्षा केंद्रांपर्यंत विशेष बस चालविण्यात येणार आहेत. यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रवासातील अडचणींचा सामना न करता विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रांवर पोहोचणे शक्य होईल. (BEST Bus)



विद्यार्थ्यांना BEST चे आवाहन :


परीक्षेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी अपेक्षित असल्याने या विशेष बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून लवकर घराबाहेर पडावे आणि उपलब्ध बस सुविधेचा वापर करून सुरक्षितपणे परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे. नीट परीक्षा ही वैद्यकीय शिक्षणासाठीची देशातील सर्वात महत्त्वाची प्रवेश परीक्षा मानली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंता कमी करण्यासाठी बेस्टने केलेली ही विशेष व्यवस्था महत्त्वाची ठरत आहे. (BEST Bus)


Comments
Add Comment

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Vishakha Raut : माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात जात प्रमाणपत्र ठरवले आहेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माहीम येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या उबाटाच्या नगरसेविका माजी महापौर

Private Coaching Center : खासगी शिकवणी केंद्रांच्या नियमनासाठी कायद्याच्या प्रारूप मसुद्यावर ४ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी व नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दृष्टीने शासनाने

Mega Block : रविवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; लोकल सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी येत्या रविवारी, दिनांक

Traffic and Power Block : दिवा स्थानकावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या कामामुळे लोकल सेवांवर परिणाम

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दिवा स्थानकावर पायाभूत सुवि