मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी व नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दृष्टीने शासनाने 'महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६' या कायद्याचा प्रारूप मसुदा तयार केला आहे. यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. हा प्रारूप मसुदा शालेय शिक्षण विभागाच्या https://education.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून नागरिकांनी आपल्या सूचना व हरकती शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. ॲनी बेझंट रोड, पुणे-४११००१ किंवा शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, डॉ. ॲनी बेझंट रोड, पुणे-४११००१ यांच्याकडे सादर कराव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे.
Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी येत्या रविवारी, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी उपनगरीय मार्गांवर ...
केंद्र शासनाने १६ जानेवारी २०२४ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांसह देशातील विविध राज्यांमधील संबंधित कायदे व नियमांचा अभ्यास करून हा मसुदा तयार करण्यात आला आहे. यावर प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व हरकतींची छाननी करून त्यावरील अभिप्रायासह एकत्रित अहवाल २० सप्टेंबर २०२६ पर्यंत शासनास सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राप्त अभिप्रायांचा विचार करून प्रारूप मसुद्यात आवश्यक ते बदल करून कायदा अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे उपसचिव समीर सावंत यांनी स्पष्ट केले आहे.