International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त फडणवीसांचे आवाहन; योग करा, निरोगी रहा

मुंबई : बदलत्या लाईफस्टाईल (जीवनशैली) मुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून, त्यापासून बचाव करण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी आणि रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नियमित योगाभ्यास केल्यास जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून दूर राहता येते, असे त्यांनी सांगितले.


जुहू बीच येथील फूड कोर्टजवळ आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या आंतरराष्ट्रीय (जागतिक) योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, शिवप्रकाश, केशव उपाध्ये, पवन त्रिपाठी, दीप्ती वायकर, उषा बेन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, सातत्याने योग करणारी व्यक्ती कोणत्याही मानसिक परिस्थितीत आलेल्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करू शकते. योगामुळे शरीर निरोगी राहण्यासोबतच मन प्रसन्न आणि स्थिर राहते. त्यामुळे योग विद्येचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे.


ते पुढे म्हणाले की, भारताने संयुक्त राष्ट्र संघात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासात अत्यंत कमी कालावधीत आणि कोणत्याही विरोधाशिवाय मंजूर झालेल्या प्रस्तावांपैकी हा एक महत्त्वाचा प्रस्ताव ठरला. आज भारताच्या पुढाकारामुळे जगभर योगाचा प्रसार झाला असून, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे.


योग ही केवळ शारीरिक व्यायाम पद्धती नसून मन, आत्मा आणि शरीर यांचा समतोल साधणारी विद्या असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. माणसाचे मन आणि निसर्ग यांचा जवळचा संबंध असून, योगाद्वारे हा संबंध अधिक दृढ होतो. नियमित योगाभ्यासामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच, शिवाय मानसिकदृष्ट्याही व्यक्ती अधिक सक्षम बनते, असे त्यांनी नमूद केले.



कार्यक्रमादरम्यान शिवप्रकाश यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने योगशिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.

Comments
Add Comment

Sachin Ahir : वरळीतील मूलभूत समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात; उपसभापती सचिन अहिर

मुंबई महापालिका आयुक्तांसोबत उपसभापती सचिन अहिर यांची महत्त्वपूर्ण

Devendra Fadnavis : महाराष्ट्र-हेसन भागीदारीतून गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र आणि हेसन दरम्यान परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य

Prakash Abitkar : आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या

Mihir Kotecha : मुलुंडमधील १०० हून अधिक बेकायदा चारचाकी हातगाड्यांवर कारवाई करा; आमदार मिहिर कोटेचा यांची मागणी

उच्च न्यायालयाचे आदेश आणि 'झिरो टॉलरन्स' धोरण असूनही बीएमसीच्या टी वॉर्डने तक्रारींकडे दुर्लक्ष केले; महापालिका

Anna Bansode : वांद्रेतील डिजिटल जाहिरात फलकांची चौकशी; ७ दिवसांत बैठक घेण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : वांद्रे (पूर्व) येथील टीचर्स कॉलनी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील एमएसआरडीसीच्या फुट ओव्हर ब्रिजवरील

Ashish Shelar : आदित्य ठाकरेंचा 'दिमागी' नक्षलींशी संवाद वाढलाय?

- मंत्री आशिष शेलार यांचा घणाघात; गणेशोत्सवातील परंपरांवर आक्षेप घेत मर्यादा आणण्याचा प्रयत्न मुंबई :