Aarey Hospital : आरे रुग्णालय महापालिकेच्या ताब्यात

- आरेतील जनतेला आता मिळणार महापालिकेची आरोग्य सेवा दारात


मुंबई (सचिन धानजी)


मुंबईतील जनतेला चांगल्यात चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने होत असला तरी गोरेगाव आरे कॉलनीतील जनता मात्र आसपास कुठेच आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. आरे कॉलनीतील रुग्णालयाची इमारत असली तरी त्यामध्ये योग्यप्रकारे वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिक आणि आदीवासी समाजाची प्रचंड गैरसोय होत असे. त्यामुळे या रुग्णालयाची वास्तू महापालिकेच्या ताब्यात घेवून वैद्यकीय सेवा सुविधा पुरवण्याच्या मागणीला आता यश आले आहे. ही वास्तू आता महापालिकेच्यावतीने चालवली जाणार आहे. पुढील ३० वर्षांच्या भाडेकरारावर ही सेवा ताब्यात घेवून त्याठिकाणी महापालिकेची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सुधार समिती आणि महापालिकेची मान्यता मिळाल्यानंतर ही सेवा उपलब्ध होणार आहे. (Aarey Hospital)


गोरेगाव आरे दुग्ध वसाहतीच्या हद्दीत आरे न.भू.क्र. ३८, आरे रुग्णालयाची इमारत आहे. या इमारतीची एकूण क्षेत्रफळ हे १२५७.९० चौ.मीटर एवढे आहे. यात संलग्न शासकीय निवासस्थानांचे क्षेत्र ६७४.३० चौ.मीटर असे एकूण क्षेत्रफळ १९३२.२० चौ. मीटर एवढे क्षेत्र "जसे आहे तशा स्थितीस" घेण्यात येणार आहे. याबाबत आरे दुग्ध आणि महापालिका करार करून राज्य शासनाकडून ही जमिन ताब्यात घेण्यासाठी आता सुधार समितीपुढे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. (Aarey Hospital)


आरेच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयात सध्या ओपीडी सेवा पुरवली जात असून या रुग्णालयाची आणि आसपासची मोकळी अशाप्रकारे एकूण १९३२.२० चौ.मी. क्षेत्रफळाचा भाग मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित केला जाणार आहे. (Aarey Hospital)



या रुग्णालयाची जागा ही "जसे आहे तशा स्थितीस" मुंबई महानगरपालिकेकडे ३० वर्ष कालावधीसाठी हस्तांतरीत करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार ही वास्तू महापालिकेला आरोग्य सुविधेसाठी उपलब्ध होत आहे. (Aarey Hospital)


आरे रुग्णालयाची इमारत (क्षेत्र. १२५७.९० चौ.मी) संलग्न शासकीय निवासस्थाने (क्षेत्र.६७४.३० चौ.मी.) असे एकूण क्षेत्रफळ १९३२.२० चौ. मी इतके क्षेत्र भाग"जसे आहे तशा स्थितीस" दवाखाना सुरु करण्याकरिता करार केल्याच्या दिनांकापासून विनामोबदला ३० वर्षांच्या कालावधीसाठी हस्तांतरीत केला जाणार असून याबाबतचा करार करणे आणि त्याला मंजुरी प्राप्त करण्यासाठी सुधार समितीच्या पटलावर प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. (Aarey Hospital)



आरेतील जनतेच्या मागणीचा हा मोठा विजय : प्रिती सातम, नगरसेविका


आरे कॉलनीतील जनतेच्या दृष्टीकोनातून हे महत्वपूर्ण पाऊल आहे, यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी मागील काही वर्षांपासून प्रयत्नशील होतो. जोगेश्वरीचे तत्कालिन आमदार आणि उत्तर पश्चिमचे विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा होता.कारण आज आरे कॉलनीतील जनतेला साप चावला किंवा काही आजार झाला तर जोगेश्वरी ट्राॅमा रुग्णालय किंवा इतर रुग्णालयात जावे लागते. त्याकरता बराच वेळ जातो. त्यामुळे आरे रुग्णालयाची जागा महापालिकेच्या ताब्यात येवून तिथे जर महापालिकेच्यावतीने वैद्यकीय सेवा सुविधा प्राप्त होणार असेल तर आरेतील जनतेसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. हा निर्णय म्हणजे येथील जनतेच्या मागणीचा मोठा विजय आहे. येथील नागरिकांची ही मागणी होती . ती आता पुर्णत्वास येत आहे. पण आजवर याठिकाणी केवळ ओपीडी सेवा दिली जात होती, पण तसे न करता याठिकाणी ओपीडीसह आंतररुग्ण सेवा उपलब्ध व्हावी यासाठी माझा अधिक प्रयत्न असेल.

Comments
Add Comment

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या

Maharashtra FDA : FDAची मोठी कारवाई! मुंबईतील 7 ठिकाणांचे परवाने निलंबित; गुटखा प्रकरणात 6 जणांना अटक

मुंबई : महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राबवण्यात