केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निर्देशानंतर सीबीआय उच्च न्यायालयात करणार अपील मुंबई : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांचे सुपूत्र आणि बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील करण्याची मागणी शिंदे यांनी लावून धरली. त्यानंतर अमित शाह यांनी सीबीआयला तात्काळ उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचे निर्देश दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; भारत देश धर्मशाळा नाही, घुसखोरांना हद्दपार करणारच मुंबई : "एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे 'शिवसेना शिंदे गट' असे म्हटले ...
पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हत्येचे प्रकरण राज्यातील सर्वाधिक गाजलेल्या हत्याकांडांपैकी एक मानले जाते. गेली दोन दशके हा खटला सीबीआय न्यायालयात सुरू होता. या कालावधीत पीडित कुटुंबीयांसह जनतेलाही आरोपींना शिक्षा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने ओमराजेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणाचा निकाल लागला, तेव्हा कोल्हापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा सुरू होती. या सभेदरम्यान शिंदेंना निकालाबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी व्यासपीठावरून बाजूला होत फोनद्वारे संबंधितांशी चर्चा केल्याचे कळते.
पवनराजे हत्याकांडाचा २० वर्षांनंतर निकाल; माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाचे मत मुंबई : दोन दशकांपूर्वी ...
यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "हे अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरण आहे. पीडित कुटुंबीयांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडला. या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असून, कायदेशीर लढाई पुढे सुरू राहील. सत्य बाहेर यावे आणि पीडित कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल," असेही त्यांनी नमूद केले.




