Saturday, July 11, 2026

BMC News : मलिक कुटुंंबाला मोठा झटका, बुशरा मलिक यांचे महापालिका सदस्यत्व रद्द

BMC News : मलिक कुटुंंबाला मोठा झटका, बुशरा मलिक यांचे महापालिका सदस्यत्व रद्द

मुंबई : मुंबई महापालिकेत सत्ताधारी पक्षाला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) (अजित पवार गट) मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुशरा मलिक यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगसेवकांची संख्या आता दोनवर आली आहे. तसेच एमआयएमच्या आणखी एका नगरसेवकांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आली. प्रभाग क्रमांक १३८च्या नगरसेविका रोशन शेख याचेही महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी महापालिका सभागृहात केली.

मुंबई महापालिकेच्या (BMC) सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १७०मधून निवडून आलेल्या बुशरा नदीन मलिक यांचे जात प्रमाणपत्र अकोला जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवल्याने त्यांचे महापालिका सदस्यत्व आपोआप रद्द होत असल्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले. तर प्रभाग क्रमांक १३८च्या एमआयएमच्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे परभणी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले. त्यामुळे एमआयएमच्या एकूण आठ नगरसेवकांपैंकी दोन नगरसेवकांचे महापालिका सदस्यत्व रद्द झाल्याने या पक्षाचे आता केवळ सहा नगरसेवक शिल्लक राहिले आहे.

यापूर्वी मुंबई महापालिकेतील प्रभाग १११मधील उबाठा नगरसेवक दिपक सावंत यांचे जातप्रमाण पत्र अवैध ठरल्याने त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची घोषणा झाली होती. तसेच त्यानंतर एम पूर्व विभागातील एमआयएमचे प्रभाग क्रमांक १३७चे नगरसेवक शमिर पटेल यांचेही महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >