ATS raids : परभणीत एटीएसचे धाडसत्र; 15 ठिकाणी एकाचवेळी छापे

परभणी : राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी परभणी शहरातील विविध भागांमध्ये मोठी कारवाई करत तब्बल 15 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईदरम्यान अनेक संशयितांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत असली तरी संपूर्ण कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एटीएसचे पथक मागील काही दिवसांपासून परभणीतील काही संशयित व्यक्तींवर पाळत ठेवून होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासून शहरातील विविध भागांत धाडसत्र राबविण्यात आले.गुजरी बाजार परिसरातील काही दुकाने, धार रस्ता परिसरातील मुमताजनगर तसेच अपना कॉर्नर परिसरातील विविध ठिकाणी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून तपास केला. कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणांवरील कागदपत्रे व इतर बाबींची तपासणी करण्यात आल्याचे समजते.



दरम्यान, एटीएसच्या कारवाईनंतर परभणी पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. शहरातील तीन महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची स्थिर पथके तैनात करण्यात आली असून धार रस्ता परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.एटीएसच्या या अचानक कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या कारवाईचे नेमके कारण, चौकशीचा विषय अथवा कोणाला ताब्यात घेण्यात आले आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.तपास यंत्रणांकडून पुढील चौकशी सुरू असून, येत्या काळात या कारवाईसंदर्भातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment

BWF World Championships : त्रिसा-गायत्रीची ऐतिहासिक कामगिरी; 15 वर्षांनंतर भारताचे महिला दुहेरीत विश्वविजेतेपदाचे पदक निश्चित

नवी दिल्लो : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने बीडब्ल्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत

Nashik Crime : तिने मला प्रेमात फसवले...; चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

Nashik Crime : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ध्रुवनगर परिसरात २६ वर्षीय वरुण भामरे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची

Jalgaon : भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात, एकाचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. लालमाती परिसरातील पहिलवान ढाब्याजवळ

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचा PR कॅमेऱ्यावर उघडा पडला’; पुण्याच्या कार्यक्रमासाठी इन्फ्लुएन्सर्सना २५,००० रुपये वाटल्याचा भाजपचा आरोप

पुणे : पुण्यात २२ ऑगस्ट रोजी आयोजित राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून मोठा राजकीय वाद

Ahilyanagar Crime : घरासमोर लावली गांजाची झाडे, 64.73 किलो वजनाचा गांजा जप्त

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील धनगरवाडी (Dhangarwadi) येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धनगरवाडी येथे चक्क घरासमोर