Nashik : टवाळखोर, तळीराम खबरदार; सार्वजनिक ठिकाणी दिसाल तर....; अंबड पोलिसांचा धडाका; 74 जणांवर कारवाई

Nashik : सार्वजनिक ठिकाणी टवाळक्या करणे, उघड्यावर मद्यपान करून नागरिकांना त्रास देणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या प्रवृत्तींविरोधात अंबड पोलिसांनी विशेष मोहीम राबवून ७४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली चार अधिकारी व २२ पोलीस अंमलदारांच्या पथकाने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडको रुग्णालय परिसर, त्रिमूर्ती चौक, दत्त मंदिर चौक, माऊली लॉन्स परिसर तसेच विविध वाईन शॉपलगतच्या भागात तपासणी मोहीम राबविली. या ठिकाणी विनाकारण गर्दी करून बसणे, येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची छेड काढणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे तसेच संशयास्पद हालचाली करणाऱ्यांची कसून पडताळणी करण्यात आली.



या कारवाईदरम्यान ७४ जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्यावर कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच उघड्यावर मद्यपान, टवाळक्या किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचविणारे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Nashik Crime : विंचूरमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला बेड्या, कारसह ४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : विंचूर येथील इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सराईत आरोपीला

Nashik : त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय स्थलांतराला स्थगिती, पर्यायी जागांचा शोध

Nashik : दर्शन पथासाठी त्र्यंबकेश्वरचे उपजिल्हा रुग्णालय (Trimbakeshwar Sub-District Hospital) अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचालींना

Jalgaon Crime : ७/१२ उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी ८५ हजारांची लाच, स्टॅम्प वेंडरविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon Crime : शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करण्याच्या कामासाठी ८५ हजार

Health Tips : शरीराला एका दिवसात किती तेलाची गरज असते? जाणून घ्या योग्य प्रमाण, अन्यथा होतील भयंकर आजार

भारतीय स्वयंपाकात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भाजीला फोडणी देण्यापासून ते पराठे आणि तळलेले पदार्थ

Yaad Lagla Song Release : आकाश यादव - पूजा चव्हाण यांचं “याड लागलं” हे रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर मिळतेय प्रेक्षकांची पसंती!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक मनमोहक नविन गाणं “याड लागलं” प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रेक्षकांना