Ramdas Kadam : 'उबाठा'चा सातवा खासदारही फुटलाय !

रामदास कदम; बंडखोरांच्या पत्रावर सही झाल्याचा दावा


मुंबई : 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger)च्या माध्यमातून उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्याची घटना ताजी असतानाच, आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam)यांनी आणखी खळबळजनक दावा केला आहे. "उद्धवजी, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला अंधारात ठेवून सतत फसवत आहेत. उबाठाचे ६ नव्हे, तर ७ खासदार फुटले असून त्या सातव्या खासदाराची सही देखील बंडखोरांच्या पत्रावर झाली आहे. हा खासदार सध्या तुमच्या अगदी बाजूलाच बसतो आणि आमच्याकडे केंद्रीय मंत्रीपद मागत आहे," असा दावा रामदास कदम यांनी केला.



शिवसेनेच्या (Shivsena) वर्धापनदिनानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा देत रामदास कदम भावुक झाले. ते म्हणाले, "माझ्या डोळ्यांसमोर आजही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उभे राहतात. चातक जसा पावसाची वाट पाहतो, तसे लाखो शिवसैनिक साहेबांच्या विचारांची वाट पाहायचे. दुर्दैवाने आज साहेब आपल्यात नाहीत. साहेबांनी स्वतः कधीही कोणतेही शासकीय पद, आमदारकी किंवा मुख्यमंत्रीपद घेतले नाही. त्यांनी रिमोट कंट्रोल स्वतःकडे ठेवून सामान्य कार्यकर्त्यांना पदे दिली, त्यांचा सन्मान केला. मनोहर पंत असोत की नारायण राणे, साहेबांच्या एका शब्दावर सगळे जीव द्यायला तयार असायचे. आज मराठी माणूस ताठ मानेने जगतोय तो केवळ बाळासाहेबांमुळेच. मात्र, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना अनुसरले नाही, अन्यथा आज शिवसेना देशात नंबर एकचा पक्ष असती."


">कदम यांनी सांगितले की, "उद्धव ठाकरे(Udhav Thackarey) यांनी स्वतः 'मातोश्री'च्या बाहेर पडून मैदानात यायला हवे. एकनाथ शिंदे हे कार्यपद्धतीमुळे खूप पुढे गेले आहेत. जेव्हा तुम्ही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससोबत गेलात, तेव्हाच बाळासाहेबांचे विचार बुडाले. जर आमदारांना, खासदारांना त्यांच्या भागात काम करण्यासाठी निधीच मिळणार नसेल, तर त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल ना? मग निधीसाठी ते विकासासोबत म्हणजेच एकनाथ शिंदेंसोबत नक्कीच येतील. मुंबईचे २५ नगरसेवक सध्या आमच्या संपर्कात आहेत आणि मी आज आमदारांवर जास्त बोलणार नाही, पण उबाठाचे उरलेले आमदारही २०२९ पर्यंत उद्धव ठाकरेंजवळ शिल्लक राहणार नाहीत", असाही दावा त्यांनी केला.



आदित्यसाठी पक्षाची वाट लावली


रामदास कदम म्हणाले, "बाळासाहेब कोणतीही बैठक घेताना सर्वांची मते जाणून घ्यायचे आणि मग निर्णय घ्यायचे. उद्धवजी, आपण कधी नेत्यांच्या बैठका घेतल्यात का? ६ खासदार बाहेर पडले, यापूर्वी १० मोठे नेते मंत्रीपदे सोडून बाहेर गेले. गुलाबराव पाटील यांनी २० आमदारांसह हात जोडून विनंती केली होती, तेव्हा तुम्ही त्यांना सरळ 'गेट आऊट' केले. लोक का सोडून जात आहेत, याचे आत्मपरीक्षण करा. फक्त आदित्य ठाकरेंसाठी तुम्ही पक्षाची वाट लावली आहे. आदित्य जेव्हा माझ्या चेंबरमध्ये यायचे, तेव्हा मी ज्येष्ठ असूनही उठून उभा राहायचो, त्यांना खुर्ची द्यायचो. पण मला काय माहीत, ते माझेच मंत्रीपद हिरावून घेतील! आमचे मंदिर असलेल्या 'मातोश्री'ची आज ही अवस्था का झाली, याचे प्रचंड दुःख होते," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Tags
राजकीयशिवसेनाउद्धव ठाकरेshiv senaरामदास कदमramdas kadamUddhav ThackerayMaharashtra politicsEknath Shindeब्रेकिंग न्यूजMarathi newsUBTउबाठामहाराष्ट्र राजकारणOperation Tiger
Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान