हे आहेत नवीन नियम
यंदाच्या परीक्षेत उमेदवारांना बुरखा, मास्क, टोपी, दुपट्टा किंवा चेहरा झाकणारी कोणतीही वस्तू घालून परीक्षा केंद्रात प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा आणि चेहरा ओळख तंत्रज्ञानाद्वारे उमेदवारांची पडताळणी केली जाणार असल्याने चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक राहणार आहे.
Transforming Nagpur : समृद्धी महामार्गाचा विस्तार आणि नवीन रिंग रोडमुळे हैदराबादचे अंतर आता अवघ्या ३.५ तासांत!
नागपूर: विदर्भातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कंबर कसली आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन ...
कायदेशीर कारवाई केली जाणार..
परीक्षा केंद्रावर उमेदवारांची बायोमेट्रिक नोंदणी, फेस रिकग्निशन आणि मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाणार आहे. संशयित उमेदवारांची आधार पडताळणीही केली जाऊ शकते. दुसऱ्या व्यक्तीने परीक्षेला बसल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा प्रथमच प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर युनिक नंबर आणि QR कोड देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा मागोवा घेणे सोपे होणार आहे. तसेच उमेदवारांनी उत्तरपत्रिकेत प्रत्यक्ष सोडवलेल्या प्रश्नांची संख्या नमूद करणेही आवश्यक असेल.
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच जमा
राज्यात २० जून हा दिवस ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ...





