Deepak Sawant : उबाठाचा एक नगरसेवक झाला कमी

संजय राऊत, सुनील राऊतला मोठा धक्का


जात प्रमाणपत्र समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने महापालिका सदस्यत्व केले रद्द


भाजपच्या सारीका पवार यांचा परतीचा मार्ग झाला खुला


मुंबई : सहा खासदार फोडून मिशन टायगर यशस्वी केल्याने उबाठाला बसलेल्या धक्क्यात आणखी एक धक्का बसला आहे. उबाठाचे विक्रोळी विधानसभेतील प्रभाग १११मधील नगरसेवक दिपक सावंत यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आले. जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्याबाबतची घोषणा महापालिका सभागृहात महापौर रितू तावडे यांनी केली. त्यामुळे उबाठाचा एक नगरसेवक कमी झाला असून उबाठाचे संख्या बळ आता ६४ एवढे झाले आहे. दिपक सावंत हे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांचे खद्दे समर्थक नगरसेवक होते. त्यामुळे एकप्रकारे राऊतांना हा मोठा धक्का मानला जात आहे.



मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ओबीसी प्रवर्गातून उबाठाच्या वतीने दिपक सावंत तर भाजपच्यावतीने सारीका पवार यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली होती. या निवडणुकीत सुमारे चार हजारांहून अधिक मताधिक्याने मनसेच्या पाठबळावर दिपक सावंत हे विजयी झाले होते. परंतु सावंत हे इतर मागास वर्गीय प्रवर्गातून निवडणूक लढल्याने त्यांनी ओबीसीच्या मिळवलेल्या प्रमाणपत्राविरोधात दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार व माजी नगरसेविका सारीका पवार यांनी आक्षेप घेत त्याबाबत तक्रारी नोंदवली होती. याबाबतची सुनावणी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीपुढे झाली असता त्यांचे प्रमाणपत्र वैध नसल्याचा निर्णय मागील साेमवारी देण्यात आला होता. याबाबतचा निर्णय महापालिकेच्या विधी विभागाने पडताळणी करून महापालिकेच्या सभेपुढे प्रशासनाच्यावतीने सादर केला.



सहायक निवडणूक व नगर शुल्क अधिकार यांनी १८ जून २०२६ रोजी महापालिका सचिवांना कळवलेल्या पत्रांत असे म्हटले आहे की, दिपक राजाराम सावंत, प्रभाग क्रमांक १११ यांनी सादर केलेले दिनांक २७ डिसेंबर २०२५ चे जात प्रमाणपत्र , जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी यांनी १५ जून २०२६ रोजी अवैध ठरवले. त्यामुळे सन २०२६-२७ नुसार अद्यायावत सुधारीत मुंबई महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम १६ (१क) (अ) अन्वये दिपक सावंत, प्रभाग १११ मधील नगरसेवक दिनांक १५ जून २०२६ पासून आपोआप रद्द होत असल्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी महापालिका सभागृहात केली आहे.


या प्रभाग १११ मधून सावंत यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार भाजपच्या सारीका पवार यांची लघुवाद न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. याबाबतचा निकाल आल्यानंतर महापालिका सभागृहात त्या निर्णयाच्या आधारे घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या

Marathi Mandatory : महाराष्ट्रात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा