Marathi Mandatory : महाराष्ट्रात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सुधारित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 19 ऑगस्ट रोजी मोटार परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी कशी करायची आणि नियमांची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने करायची, यावर चर्चा होणार आहे. (Marathi Bhasha)

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संवर्गातील एकूण 9 लाख 78 हजार 541 वैध परवाने आहेत. यामध्ये 9 लाख 16 हजार 884 ऑटोरिक्षा आणि 61 हजार 657 टॅक्सी परवान्यांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे 4 लाख 62 हजार 387 रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारक आहेत. (Pratap Sarnaik)



रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा दररोज हजारो प्रवाशांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यात योग्य संवाद होण्यासाठी चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे परिवहन विभागाचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याबाबतही उद्याच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, परिवहन विभागाच्या पुढाकाराने गेल्या साडेतीन महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम’ अभियानाला चालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 1 लाख 65 हजारांहून अधिक चालकांनी या अभियानात सहभाग घेतला आहे. या माध्यमातून अनेक चालकांनी मराठी शिकण्याची तयारी दर्शवली असून प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचा आत्मविश्वासही मिळाल्याचे सांगण्यात आले. (Taxi- Auto Driver)

परिवहन विभागाने 105 दिवस राबविलेले ‘मराठी शिका’ अभियान संपले असले तरी मराठी शिकू इच्छिणाऱ्या चालकांना पुढेही सहकार्य केले जाणार आहे. मात्र, अभियानात सहभागी न झालेल्या आणि अद्याप व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेल्या चालकांबाबत नियमांची अंमलबजावणी कशी करायची, यावर आता सरकारकडून चर्चा केली जाणार आहे.

उद्याच्या बैठकीत या चालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी, नियमांचे पालन न करणाऱ्यांवरील कारवाई आणि पुढील कार्यपद्धती याबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. (Mumbai News)

 
Comments
Add Comment

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका