Thursday, June 18, 2026

Shreyanka Patil : टीम इंडियाला मोठा धक्का ! स्टार ऑल राउंडर स्पर्धेतून बाहेर ?

Shreyanka Patil : टीम इंडियाला मोठा धक्का ! स्टार ऑल राउंडर स्पर्धेतून बाहेर ?

Mumbai : भारतीय महिला संघाने टी २० विश्वचषकात (Womens T20 World Cup 2026) दोन्ही सामने जिंकून दमदार सुरुवात केली आहे. मात्र,आता संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अ गटातील नेदरलँड्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयंका पाटीलला (Shreyanka Patil) पायाला दुखापत झाली आणि तिला मैदान सोडावे लागले. तिला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले. ती गेल्या काही काळापासून भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करत होती, त्यामुळे तिची ही दुखापत संघासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

नेमकं घडलं काय ?

नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान, श्रेयंका पाटील तिचे सहावे षटक टाकत होती, तेव्हा स्ट्राईकवर असलेल्या डच फलंदाज फेबीने श्रेयंकाच्या पहिल्याच चेंडूवर मिडविकेटच्या दिशेने फटका मारला.तो फटका पकडण्याच्या प्रयत्नात तिचा पाय घसरला आणि तिला दुखापत झाली. ती सरळ उभी राहू शकत नव्हती. मैदानाबाहेरून तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. बीसीसीआयने श्रेयंकाच्या दुखापतीबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आणि ती लवकरात लवकर बरी व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली.

भारतीय महिला संघाचा नवा विक्रम

भारतीय महिला संघाने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात एका नवीन विक्रमाची नोंद केली आहे. या सामन्यात भारतीय महिला फलंदाजांनी २० षटकांत २०९ धावा करून स्फोटक कामगिरी केली. महिला टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील ही भारताची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी मैदानावर आक्रमक खेळ करत पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची धडाकेबाज भागीदारी केली. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या दोघींनीही शानदार अर्धशतके झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >