Nashik Vidhan Parishad Election : दुपारी 12 पर्यंत 619 पैकी 'इतक्या' मतदारांनी बजावला हक्क

Nashik Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (गुरुवार) सकाळी ८ वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. या मतदान प्रक्रियेत दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ९.८५ टक्के मतदान झाले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.



तीन उमेदवार रिंगणात


या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात असून जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत ६१९ मतदारांपैकी ६१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, निवडणूक निरीक्षक मिलिंद शंभरकर यांनी सकाळी नाशिक आणि चांदवड तहसील कार्यालयातील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे उपस्थित होते.



कुठे काय स्थिती ?


येवला : येवला येथील मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ एकच मतदान नोंदविण्यात आले. येवल्याचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.


भगूर : दुपारी दीड वाजेच्या सुमारास भगूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बसमधून जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मतदान केले.


मतदानाची टक्केवारी अद्याप कमी असली तरी दुपारनंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

ED's swift action : ऑनलाइन गेमिंग-बेटिंग प्रकरणात ईडीची धडक कारवाई

नागपूर : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती