आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर; मंजुरीसाठी लागणारा कालावधी कमी करण्याबाबत सकारात्मक
मुंबई : राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांना आता अधिक सुलभ आणि सन्मानजनक सेवा मिळणार आहे. या योजनांनुसार उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचे खास 'वेलकम किट' देऊन स्वागत केले जाईल, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी केली.(PM Kisan Yojana)
१५ दिवसांत एसटीच्या उत्पन्नात ४३.८३ कोटी रुपयांची वाढ मुंबई, दि. १८ : राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर परिघातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात ...
मुंबईतील आरोग्य भवन येथे झालेल्या अंगीकृत रुग्णालयांच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत या विशेष 'वेलकम किट'चे लोकार्पण करण्यात आले. या वेळी रुग्णालयांच्या विविध तांत्रिक अडचणींवर चर्चा करताना, उपचारापूर्वीच्या पूर्व-मंजुरीसाठी लागणारा कालावधी कमी करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासनही आरोग्य मंत्र्यांनी दिले. पात्र लाभार्थ्यांना कोणतीही आर्थिक मागणी न करता पूर्णपणे मोफत आणि दर्जेदार उपचार मिळवून देणे ही सर्व संबंधित यंत्रणांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मंत्री आबिटकर यांनी या वेळी स्पष्ट केले.(PM Kisan Yojana)
मलकानगिरी : ओडिशा राज्यातील मलकानगिरी (Malkanagri) जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. एका आठ महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...
आरोग्य भवनातील या बैठकीला राज्यस्तरीय अधिकारी, शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले की, गरीब रुग्णांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात 'आरोग्यमित्र' हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे आरोग्यमित्रांची नियुक्ती, त्यांचे विशेष प्रशिक्षण आणि क्षमता विकास यावर सरकारने आता अधिक भर दिला आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आवश्यक ते मार्गदर्शन, कागदपत्रांची मदत आणि योग्य सुविधा मिळवून देण्यासाठी आरोग्यमित्रांनी अधिक संवेदनशीलतेने कार्य करावे, असे निर्देश त्यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत पात्र रुग्णाला उपचार नाकारले जाणार नाहीत, याची काटेकोर दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.(PM Kisan Yojana)
Nashik : नाशिक विभागातील बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण राज्यात गाजत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) या संदर्भात गुन्हा दाखल असून या प्रकरणाने ...
क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया वेगवान होणार
या बैठकीदरम्यान दोन्ही आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रुग्णांना सेवा देताना वापरल्या जाणाऱ्या विविध डिजिटल प्रणालींबाबत रुग्णालय प्रतिनिधींना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णांची नोंदणी आणि क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी या डिजिटल यंत्रणेचा मोठा फायदा होणार आहे.रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्यासाठी 'प्री-ऑथरायझेशन' मंजुरीसाठी लागणारा वेळ कमी केला जाईल. नियमित डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांना प्रत्येक सायकलच्या वेळी करावी लागणाऱ्या ई-केवायसीच्या सक्तीमधून सूट देण्याबाबत विचार सुरू आहे. अस्थिरोग उपचारांशी संबंधित काही वैद्यकीय पॅकेजेसच्या दरांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यावरही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यामुळे या योजनेतील सर्व घटकांनी समन्वय आणि जबाबदारीची भूमिका निभावावी, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.(PM Kisan Yojana)






