औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात
मुंबई: पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आल्यानंतर आता महापालिकेने कमर्शियल वापराच्या हॉटेल्स, कंपन्यांसह उद्योगधंद्यांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत सुनिश्चित करण्यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरावरही बुधवारी १७ जून २०२६ पासून आवश्यक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार, सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्यात येणार असून नवीन बांधकामांसाठी दिल्या जाणा-या जल जोडणी स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व जलतरण तलावांच्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्यात करण्यात येणार आहे. याबरोबरच औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्यावतीने पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा गैरवापर अथवा अपव्यय होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल्ा, असा स्पष्ट इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.
जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या हत्तीणीने जिद्दीच्या जोरावर जीवनाची ...
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार, महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करत काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार, महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणी कपातीच्या कालावधीत करावयाच्या उपायोजनांबाबत सविस्तर परिपत्रक निर्गमित केले आहे.मुंबई शहर व उपनगरांसाठी सध्या प्रतिदिन सुमारे ४ हजार ६६४ दशलक्ष लीटर (एमएलडी) इतकी पाण्याची आवश्यकता आहे. उपलब्ध पर्यायामधून मुंबईला प्रतिदिन सरासरी ४ हजार १०० दशलक्ष लीटर इतके पाणी पुरविले जाते. खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या सुचनेनुसार मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली असून आज १६ जून २०२६ रोजी उपलब्ध पाणी साठा हा १०.३५ टक्के इतकाच शिल्लक आहे. पावसाळा लांबल्याने हा पाणीसाठा अधिकाधिक दिवस टिकविण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर आहे.महाराष्ट्र शासन जल संपदा विभागाच्या निर्देशानुसार, पाण्याच्या इतर वापरावरही बुधवार, १७ जून २०२६ पासून आवश्यक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरते खंडित करणे, नवीन बांधकाम जल जोडणी मंजूर करण्यात येणार नाही. सर्व जलतरण तलावांना देण्यात आलेल्या जलजोडण्या तात्पुरते खंडीत करणे वाढीव जलजोडणी / अतिरिक्त जलजोडणी करीता अर्ज प्राप्त झाल्यास पुरेसा पाणीसाठी तयार होईपर्यंत मागणी प्रलंबित ठेवणे, औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. एरीअेटेड वॉटर व पॅकेज वॉटर बॉटलिंग प्लॅंटला दिलेल्या जलजोडण्यातून होणारा पाणीपुरवठा तेथील कामगारांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेइतका कमी करण्यात येत आहे.
जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने मुंबईतील पाणीटंचाईची परिस्थिती ...
याशिवाय, सार्वजनिक स्वच्छतागृह व प्रसाधनगृह सांभाळणाऱ्या संस्थांनी जास्तीत जास्त टॅंकर तथा बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा व पिण्याच्या पाण्याची बचत करावी. पिण्याच्या पाण्याच्या वापराव्यतिरिक्त, इतर वापरासाठी विहिरी, कुपनलिका, विधनविहिरी यांचा जास्तीत जास्त वापर करावा. वाहन धुणे, उद्यानांमधील झाडांना पाणी घालणे, रस्ता / परिसर धुण्यासाठी बोअरवेल अथवा विहिरीच्या पाण्याचा वापर करावा.मध्य रेल्वे / पश्चिम रेल्वे / आसीएफ/ एचपीसीएल/ बीपीसीए/ नेव्ही/ एमआयडीसी/ बीपीटी आदी आस्थापनांनी दुय्यम वापरासाठी व परिचालनासाठी कुलाबा तसेच इतर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील (एसटीपी) प्रक्रियायुक्त पाण्याचा फेरवापर करावा, असेदेखील परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई : टीव्हीविश्वात निवडक भूमिका केलेल्या २२ वर्षांच्या संचिता उगलेने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टी सुन्न झाली आहे. संचिताच्या ...
महत्वाचे निर्णय
सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत
नवीन बांधकामांसाठी दिल्या जाणा-या जल जोडणी स्थगित
सर्व जलतरण तलावांच्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत
औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात
सार्वजनिक स्वच्छतागृह व प्रसाधनगृहांमध्ये टॅंकर तथा बोअरवेलच्या पाण्याचा वापर
मध्य रेल्वे / पश्चिम रेल्वे / आसीएफ/ एचपीसीएल/ बीपीसीए/ नेव्ही/ एमआयडीसी/ बीपीटी आदींना प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करणे बंधनकारक