Pandharpur Crime : धक्कादायक! रेल्वे रुळांजवळ मृतदेह, तुटलेला पाय घराच्या दरवाज्यात टांगलेला अवस्थेत

पंढरपूर पोलिसांसमोर गूढ वाढले


पंढरपूर : धावत्या रेल्वेची धडक बसून 24 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू  (Railway Accident Death) झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. मात्र, या प्रकरणाला धक्कादायक वळण तेव्हा मिळाले, जेव्हा मृत तरुणाचा तुटलेला पाय त्याच्या मावशीच्या घराच्या दरवाजावर टांगलेल्या अवस्थेत आढळून आला. या विचित्र आणि गूढ प्रकारामुळे संपूर्ण पंढरपूर शहरात खळबळ उडाली असून नातेवाइकांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. (Pandharpur Crime)


मृत तरुणाचे नाव रोहित मधुकर कोरे (वय 24, रा. अनिलनगर, पंढरपूर) असे आहे. तो रिक्षाचालक म्हणून काम करत होता.


पंढरपूर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास टेंभुर्णी रेल्वे गेटजवळ एका तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.



दरम्यान, शहरातील एका घराच्या दरवाजाला मानवी पायाचा तुकडा टांगलेला असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तो पाय रेल्वे अपघातात मृत झालेल्या तरुणाचाच असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. पुढील तपासात मृत व्यक्ती रोहित कोरे असल्याचे स्पष्ट झाले.


रोहितचा तुटलेला पाय त्याच्या मावशीच्या घराच्या दरवाजावर नेमका कोणी आणि कोणत्या हेतूने टांगला, हा प्रश्न सध्या अनुत्तरित असून पोलिसांसाठी मोठे कोडे ठरला आहे.


या घटनेनंतर रोहितच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त करत हा अपघात नसून सुनियोजित हत्या असल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूच्या काही वेळ आधी रोहितचा काही व्यक्तींशी वाद झाला होता. त्याच वादातून त्याची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळांवर टाकण्यात आला असावा, असा त्यांचा संशय आहे.



प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलिसांनी रोहितच्या मोबाईल कॉल डिटेल्स, सीडीआर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.


रोहितचा मृत्यू अपघातामुळे झाला की त्यामागे घातपात आहे, याचे उत्तर तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.