Jalgaon : आरपीएफच्या सहाय्यक फौजदाराचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, अमळनेर रेल्वे स्थानकात खळबळ

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर रेल्वे स्थानकावर (Amalner Railway Station) सोमवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे संरक्षण दल अर्थात आरपीएफमध्ये (RPF) कार्यरत असलेल्या सहाय्यक फौजदाराने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने रेल्वे प्रशासनासह सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जयपाल सिंह (Jaipal Singh)असे जखमी सहाय्यक फौजदाराचे नाव असून, ही घटना अमळनेर रेल्वे स्थानक परिसरातील आरपीएफ कार्यालयात घडल्याची माहिती समोर आली आहे.



नेमकं काय घडलं ?


प्राथमिक माहितीनुसार, जयपाल सिंह यांनी त्यांच्या ताब्यातील शासकीय शस्त्रातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील कर्मचारी घटनास्थळी धावले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या फौजदाराला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी धुळे (Dhule) येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक कारणे, मानसिक तणाव किंवा इतर कोणते कारण याबाबत तपास यंत्रणा माहिती गोळा करत आहेत. घटनेनंतर रेल्वे संरक्षण दल आणि संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.