Nashik Vidhan Parishad Election : जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीची तयारी पूर्ण, 9 ठिकाणी केंद्रे

Nashik Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीसाठी अवघा १ दिवस शिल्लक राहिला आहे. दरम्यान, नाशिक विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने (District Administration) जय्यत तयारी पूर्ण केली आहे. एका जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीचे मतदान गुरुवारी, म्हणजेच उद्या १८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ६१९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.



नऊ मतदान केंद्रांची व्यवस्था


या निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात एकूण नऊ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सोबतच मतदानासाठी जम्बो बॅलेट बॉक्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू असून अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.



मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश


मतदानासाठी मतपत्रिकेचा वापर केला जाणार असून मतदारांनी पसंतीक्रमानुसार मतदान करायचे आहे. मतदानानंतर मतमोजणी २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज १६ जून रोजी दुपारी ४ वाजल्यापासून ते मतदान संपेपर्यंत म्हणजेच १८ जून रोजी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



जम्बो बॅलेट बॉक्सची व्यवस्था


सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, भित्तिपत्रके, घोषणा, झेंडे, कापडी फलक व चिन्ह इ. काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी. या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. मतदान प्रक्रियेकरिता आवश्यक जम्बो बॅलेट बॉक्स व्यवस्था करण्यात आलेली आहे, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Aayush Prasad) यांनी सांगितले.


दरम्यान ,जिल्ह्यातील मतदान केंद्रांमध्ये नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, निफाड, येवला, मालेगाव, चांदवड, कळवण आणि बागलाण या ठिकाणांचा समावेश आहे. महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे सदस्य या निवडणुकीत मतदान करणार आहेत.



जिल्ह्यातील मतदान केंद्र


१. नाशिक तहसील कार्यालय : नाशिक महानगर पालिका सदस्य (१२२), भगूर नगर परिषद सदस्य (२३) देवळाली छावणी परिषद (१).


२. दिंडोरी तहसील कार्यालय : दिंडोरी नगर पंचायत सदस्य (१९), पेठ नगर पंचायत सदस्य (१८).


३. इगतपुरी तहसील कार्यालय : इगतपुरी नगर परिषद सदस्य (२४), त्र्यंबकेश्वर नगर परिषद सदस्य (२३).


४. निफाड तहसील कार्यालय : निफाड नगर पंचायत सदस्य (१९), पिंपळगांव बसवंत नगर परिषद (२९), ओझर नगर परिषद (३१), सिन्नर नगर परिषद सदस्य (३४).


५. येवला तहसीलदार कार्यालय : येवला नगर परिषद सदस्य (३०), नांदगाव नगर परिषद सदस्य (२३), मनमाड नगर परिषद सदस्य (३५).


६. मालेगाव तहसीलदार कक्ष : मालेगाव महानगर पालिका सदस्य (८४).


७. चांदवड तहसीलदार कक्ष : चांदवड नगर परिषद पंचायत सदस्य (२३), देवळा नगर पंचायत सदस्य (१८).


८. कळवण तहसीलदार कक्ष : कळवण नगर पंचायत सदस्य (१९), सुरगाणा नगर पंचायत सदस्य (१९),


९. बागलाण तहसीलदार कक्ष : बागलाण सटाणा नगर परिषद सदस्य (२८)

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक