Pratap Sarnaik's Operation Tiger : मंत्री प्रताप सरनाईक यांची मध्यस्थी... 'ऑपरेशन टायगर' फत्ते

मुंबई : उबाठा गटाचा सहावा खासदार राजी होत नसल्याने 'ऑपरेशन टायगर' रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा सर्व चक्रे वेगाने फिरवून अखेर ही मोहीम फत्ते केली. शिंदेंनी ही किमया कशी साधली, याच्या सुरस कथा आता समोर येऊ लागल्या आहेत. उबाठाचे निष्ठावंत खासदार ओमराजे निंबाळकर 'मातोश्री'ची साथ सोडून मध्यरात्री दिल्लीत दाखल झाले आणि 'ऑपरेशन टायगर' पूर्ण झाले. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पडद्यामागून लावलेली तगडी 'फिल्डिंग' आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुण्यातून उपलब्ध करून दिलेले विशेष विमान, या दुहेरी रणनीतीमुळे अवघ्या काही तासांत ही प्रक्रिया पूर्ण झाली. (Pratap Sarnaik's Operation Tiger)


ओमराजे निंबाळकर हे शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहतील, असा कयास वर्तवला जात होता. मात्र, अत्यंत नाट्यमय आणि गुप्त पद्धतीने राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे उबाठाची तटबंदी पूर्णपणे ढासळली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत ठाकरे गटाच्या प्रत्येक खासदाराची नाडी ओळखण्याची जबाबदारी शिवसेनेतील बड्या नेत्यांवर सोपवण्यात आली होती. धाराशिवचे खासदार असलेल्या ओमराजे निंबाळकर यांना मनवण्याचे कठीण काम धाराशिवचेच पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आले होते. सरनाईक यांनी ठाण्यातून या संपूर्ण ऑपरेशनची सूत्रे हलवली. पालकमंत्री म्हणून ओमराजे यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून सरनाईक यांनी आधीच या राजकीय पेरणीला सुरुवात केली होती. खासदारांच्या अंतर्गत अडचणी आणि राजकीय भविष्य सुरक्षित करण्याचा शब्द देऊन सरनाईक यांनी अखेर ओमराजे यांना शिवसेनेत येण्यास राजी केले. (Pratap Sarnaik's Operation Tiger)



तीनदा बदलला प्लॅन; मध्यरात्री १ वाजता पुण्यातून उड्डाण : 


ओमराजे निंबाळकर हे गेल्या काही दिवसांपासून कुटुंबासह पुण्यात वास्तव्यास होते. त्यांच्यावर पाळत ठेवली जाऊ नये म्हणून मंगळवारी दिवसभरात त्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या वेळेत तब्बल तीन ते चार वेळा बदल करण्यात आला. विमानाचे उड्डाण आधी दुपारी ३, नंतर ५ आणि पुढे रात्री ९ वाजता करण्याचे ठरले होते, मात्र गुप्तता पाळण्यासाठी प्लॅन बदलला गेला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने पुणे विमानतळावर २ खासगी विमाने सज्ज ठेवण्यात आली होती. अखेर सर्व यंत्रणांना चकवा देत रात्री १ वाजता ओमराजे यांनी पुण्यातून दिल्लीसाठी उड्डाण केले. (Pratap Sarnaik's Operation Tiger)



तानाजी सावंत आणि जय राजेही सोबत : 


या विशेष विमानाने ओमराजे निंबाळकर एकटेच दिल्लीला गेले नाहीत, तर त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत तसेच जय राजे निंबाळकर हे देखील उपस्थित होते. धाराशिवच्या राजकारणातील पारंपरिक शत्रू समजले जाणारे तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर हे एकाच विमानातून दिल्लीला गेल्याने, ओमराजे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे. (Pratap Sarnaik's Operation Tiger)



बंडखोर खासदार : 


ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील (Pratap Sarnaik's Operation Tiger)

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक